Home विदर्भ हिंगणघाट येथे घडलेल्या घृणास्पद घटनेच्या वंचित बहुजन आघाडी कडून निषेध.!

हिंगणघाट येथे घडलेल्या घृणास्पद घटनेच्या वंचित बहुजन आघाडी कडून निषेध.!

141

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. ०५ :- जिल्ह्यातील हिंगणघाट येथे मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेघात शहरात सर्व पक्षिय मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
कु. अंकिता बंडूजी पिसुड्डे या शिक्षिकेवर आरोपी विकेश उर्फ विक्की द्यानेश्वर नगराळे या नराधमाने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, त्या आरोपीला कठोर शिक्षा करून, या घटनेची फास्ट ट्रक कोर्टात सुनावणी करून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्यात यावी व पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी मार्फत वंचित बहुजन आघाडी तर्फे कुणाल वासेकर तालुकाध्यक्ष विक्रांत भगत दिलीप कहूरके अशोक रामटेके अजय डांगरे सिद्धार्थ जामनकर सचिन खोब्रागडे सुहास जीवनकर विशाल कुंभारे सुमित सोगे गोलू कुंभारे प्रशांत निमसरकार चेतन भगत अमित जंगले निखिल जवादे रसूल पठाण सुनील कुंभारे निवेदन देऊन कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली.