Home मराठवाडा हिंगणघाटच्या घटनेची पुनरावृत्ती महिलेच्या घरात घुसून जिवंत जाळले….!!

हिंगणघाटच्या घटनेची पुनरावृत्ती महिलेच्या घरात घुसून जिवंत जाळले….!!

40
0

महिलेची प्रकृती चिंताजनक…!!

अमीन शाह

सिल्लोड / औरंगाबाद , दि. ०५ :- शिक्षिकेला एकतर्फी प्रेम प्रकरणातून जिवंत जाळल्याच्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे घडली आहे. एका 50 वर्षीय महिलेला गावातील बिअर बार चालकानं रात्री घरात घुसून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं. सिल्लोडच्या अंधारी गावात ही हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.

या घटनेत महिला 95 टक्के भाजली आहे. तिच्यावर औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या महिला रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. महिलेल्या पेटवल्याप्रकरणी आरोपी संतोष सखाराम मोहितेला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्याला न्यायालयानं 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही महिला घरात एकटी झोपलेली होती. तेव्हा संतोषनं दरवाजा वाजविला आणि आत घुसला. ‘तू असा रात्री माझ्या घरी येत जाऊ नको, माझी बदनामी होते, असं म्हणताच वाद विकोपाला जावून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Unlimited Reseller Hosting