Home जळगाव जळगावात फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून दिड लाखांचा दंड वसुल

जळगावात फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून दिड लाखांचा दंड वसुल

25
0

प्रतिनिधी – लियाकत शाह

भुसावळ , दि. ०५ :- रेल्वेची मोहिम जनरल तिकीटावरुन रीझर्व्ह डब्यात प्रवास करणाऱ्यांवरही कारवाई विना तिकीट प्रवासासह जनरल तिकीटावरून स्लीपर डब्यात प्रवास करणाऱ्यांविरुद्ध रेल्वेच्या विशेष मोहिम मंगळवारी जळगाव रेल्वे स्थानकावर ३०६ केसेसच्या माध्यमातून एक लाख एक लाख ५१ हजार ४५ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. धडक मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ भुसावळ मंडळाचे वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा व सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार (टी.जा.) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव रेल्वे स्थानकावर मंगळवारी मोहिम राबवण्यात आली. त्यात रेल्वे सुरक्षा बलाचेच तर २५ रेल्वे तिकीट तपासणीसांनी केलेल्या कारवाईत ३०६ केसेसच्या माध्यमातून एक लाख ५१ हजार ४५ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. विना तिकीट प्रवास करणाऱ्या ८१ प्रवाशांकडून ४१ हजार ४५५ रुपयांचा दंड तसेच जनरल तिकीटावरून स्लीपर डब्यात प्रवास करणाऱ्या २२३ प्रवाशांकडून एक लाख नऊ हजार ४५० रुपयांचा तसेच सामानाची बुकींगविना वाहतूक करणाऱ्या दोघा प्रवाशांकडून ४३६ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. एका प्रवाशाने दंड न भरल्याने त्याच्याविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर पाच प्रवाशांवर रेल्वे अॅक्ट १५५ अन्वये कारवाई करण्यात आली. तपासणी पथकाचे मुख्य तिकीट निरीक्षक वाय. डी. पाठक यांच्यासह विविध पथकातील तिकीट तपासणी कर्मचारी सहभागी झाले.

Unlimited Reseller Hosting