
फुलचंद भगत
वाशिम:-मालेगाव तालुक्यातील जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आदिवासी व बंजारा बहुल गावामध्ये काही विघंसंतोषी लोकांकडून मोठ्या प्रमाणात हातभट्टी ची दारू काढल्या जात असल्यामुळे गावात सहज विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यामुळे तरुणपिढी व्यसनाधिन होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे व त्यामुळे घराघरात वादविवाद हे नेहमीच होत आहेत त्यामुळे पैशाच्या जोरावर दारू विक्रेत्याची दादागिरी ही वाढतच चालली आहे त्यामुळे दारुपिण्यासाठी व्यसनाधीन तरुणपिढी ही पैशासाठी पत्नी, आईवडिल व मुलाबाळाना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे या नेहमीच्या कटकटीचा कंटाळून वरदरी येथील शेकडो महिला मुलाबाळांसह पोलीस स्टेशनवर धडकल्या व गावागावात हातभट्टी दारूच्या महापुरावर त्वरित नियंत्रण मिळवून कायम स्वरुपी गावातून हातभट्टी सह अवैध दारू विक्रीचा नायनाट करण्यासाठी वाशिम पोलीस अधीक्षक याच्याकडे जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदारद्वारे वरदरी येथील महिलांनी निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे .निवेदन देण्यासाठी वरदरी येथील लहान मुलासह महिला पुरुष यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती दिसून आली.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206












































