Home यवतमाळ कळंब पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी कत्तलखान्यात जाणाऱ्या बोलोरो पिकपला पोलिसांनी पकडले!

कळंब पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी कत्तलखान्यात जाणाऱ्या बोलोरो पिकपला पोलिसांनी पकडले!

124
श्रीकांत देशमातुरे
कळंबः कळंब पोलीस स्टेशन अंतर्गत दि‌ २०, सप्टेंबर २०२३ रोजी कळंब शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, कळंब ते यवतमाळ मार्गे वाहन क्रमांक एम एवं ३० जेबी २८२० बोलोरो पिकअप या वाहनामध्ये ज्याचे पाठीमागे डाल्याला पिवळी रंगाची ताडपत्री ने झाकलेल्या गाडीमध्ये अवैधरित्या कत्तलीकरीता जनावरे वाहतुक करून घेवुन जात आहे अशा माहीती वरून चापर्डा गावाच्या समोरच्या रोडवर सापळा रचुन थांबलेले पोलीस अधिकारी यांनी वाहन क्रमांक एम एवं ३० जेबी २८२० बोलोरो पिकअप वाहनास पकडले असून वाहन पकडुन चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शेख आयफस शेख हन्नान वय २८ वर्ष रा. कुरेशीपुरा कळंब असे सांगीतले. वरून पंचाचे समक्ष गाडीचे पाठीमागील डाल्याची पाहणी केली असता डाल्यात ०७ गोवंश जनावरे किमत ७०,००० रु मिळुन आले असून वरून सदर वाहनांची किंमत ४,८०,००० एकुण ५,५०,००० रु चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतली आहे. सदरची कार्यवाही . पोलीस निरिक्षक दिपमाला भेडें ठाणेदार पो स्टे कळंब. पोहवा / ७५५ ओमप्रकाश धारणे. पोहवा ९१८ राजु कुडमेथे होमगार्ड २०४२ राहुल खोब्रागडे यानी केली.
ही कारवाई कळंब पोलीसांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल जनतेतुन समाधान व्यक्त केले जात आहे.