Home बुलडाणा अंढेरा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा अकरा जुगारी पकडले ,

अंढेरा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा अकरा जुगारी पकडले ,

118

प्रतिनिधी , ५ ऑगस्ट. फोटो
अंढेरा – पोलीसांना मिळालेल्या गुपित माहिती वरुण पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला . आणि आरोपींच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करीत अकरा आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला . ही घटना ४ ऑगस्ट रोजी रोहडा येथे घडली त्यामुळे परीसरात चांगलीच खळबळ उडाली आहे .
अंढेरा पोलीस स्टेशनला काही दिवसापूर्वी ठाणेदार म्हणुन रुजू झालेले ठाणेदार विकास पाटील यांनी पदभार स्वीकारल्या पासून परिसरातील गावामध्ये जावून भेटी देणे सुरू केले आहे त्यामध्ये काही गावातील अवैध धंदे तथा अवैध रेती वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने मोठया प्रमाणावर जुगार , वरली मटका सुरू झाला आहे त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच मनोबल वाढले असल्याने रोहडा येथे राजरोसपणें जुगार खेळल्या जात आहे ही गुपित माहिती पोलिसांना लागताच ४ ऑगस्ट रोजी जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता अकरा आरोपी पकडण्यात यश आले . त्यामध्ये आरोपी रामदास यादव सोलाट , प्रवीण भगवान शिरोळे , पढरी रघुनाथ लव्हाळे ,दिनकर माणिकराव बुरुकुल ,शुभम गजानन खरात , योगेश गजानन बूरुकुल ,सुनील उत्तम साबळे , अंबादास रामचंद्र सोरमारे , गजानन माणिकराव बुरुकुल , विजय नारायण घारे , संतोष सुभाष भुसारी , अशा एकूण अकरा आरोपी कडून मुद्देमाल जप्त करीत ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे . या कार्यवाही मध्ये पोहेकाँ कैलास उगले , भरत पोफळे, गोरख राठोड , सोनकांबळे, गवई , गिरी , आदींनी परिश्रम घेतले.