
(अयनुद्दीन सोलंकी)
————————
घाटंजी: तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशी दोन पदे असून हे दोन्ही कृषी अधिकारी यांनी घाटंजी तालुक्यातील कृषी केंद्र तपासणीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याची जोरदार चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे. घाटंजी तालुक्यातील अनेक कृषी केंद्रात बियाने जादा दरात विक्री करण्यात येत असून कृषी केंद्र चालक रासायणिक खतावर लिंकींग करने सुरू केले आहे. विशेषतः अनेक कृषी केंद्रांत शेतकऱ्यांना कृषी साहित्य विक्रीचे बिल देत नसल्याची ओरड शेतकरी वर्गात सुरू आहे. रासायनिक खतांच्या लिंकींग मुळे अनेक शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध होत नाही. अनेक कृषी केंद्रांत बोगस बियाणे तेलंगाणा राज्यातून आणुन विक्री केल्या गेली आहे.
मात्र, घाटंजी तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी घाटंजी तालुक्यातील किती कृषी केंद्रांची तपासणी केली. बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके यांचे किती नमुने घेतले याची माहिती भ्रमणध्वनी वरुन विचारली असता कार्यालयात येऊन माहीती घ्या असे कृषी अधिकारी यांचे कडून उद्धटपणे सांगण्यात येते.
घाटंजी तालुक्यातील अनेक कृषी केंद्रांत आवक साठा, विक्री साठा, शिल्लक साठा नियमानुसार भरल्या जात नसुन यवतमाळ जिल्ह्यातील कृषी विकास अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे.
घाटंजी पंचायत समितीत तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण लखमोड असुन प्रभारी तालुका कृषी अधिकारी गजानन इंगोले हे आहे. संबंधित कृषी अधिकारी पंचायत समिती कार्यालयात कमी तर कृषी केंद्रात अधिक दिसून येत असल्याचे चित्र पहावयास घाटंजी तालुक्यात मिळत आहे.
या पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांचे कडे पारवा, शरद (नागेझरी) व टिपेश्वर ग्राम पंचायतीवर प्रशासक असतांना त्यांनी ग्रामपंचायत सचिव यांना विश्वासात न घेता पंधराव्या वित्त आयोगातील साहित्य कागदोपत्री खरेदी केल्याचे दाखवून रक्कम हडप केल्याचा आरोप होत आहे. प्रशासक असतांना कृषी अधिकारी यांचे कडून ग्रामपंचायतीचा प्रभार काढण्यात आला आहे. सदर अधिकारी हे कार्यालयात आठवड्यातून एक दिवस तोंड दाखवण्यासाठी येतात. तर बाकी दिवस कुठे भेटी देतात हे कळायला मार्ग नाही.
एकंदरीत कृषी विकास अधिकारी यांनी घाटंजी तालुक्यातील कृषी केंद्रांना भेटी देऊन तपासणी केल्यास अनेक प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विशेष म्हणजे तालुका कृषी अधिकारी यांचे कडून शासनाकडून प्राप्त झालेले बियाणे हे परस्पर जवळच्या शेतकरी यांना देण्यात आले. तर जिल्हा कृषी महोत्सव मध्ये बोगस शेतकरी भेटीचे बिल पास केले असून आत्मा समितीमध्ये अनेक बोगस नावाने सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
नानासाहेब देशमुख कृषी संजीवन पोकरा मध्ये चिरीमिरी घेऊन शेतकऱ्यांना लाभ दिल्याची जोरदार चर्चा घाटंजी तालुक्यात सुरू आहे.
घाटंजी तालुक्यातील दोन्ही कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या हिता करिता व किती शेतकऱ्यांना मार्गदर्शन व माहिती दिली याचा कुठेही उहापोह करण्यात आला नसल्याने सदर प्रकरणात चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.











































