Home यवतमाळ मंगी (सावरगांव) येथे अवैद्यरित्या गोवंशीय 6 जनावरांची कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांना पारवा पोलीसांनी...

मंगी (सावरगांव) येथे अवैद्यरित्या गोवंशीय 6 जनावरांची कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांना पारवा पोलीसांनी दिले जिवदान.

98

(अयनुद्दीन सोलंकी )

————————-
घाटंजी – यवतमाळ जिल्ह्यातुन अवैद्यरित्या वाहतूक करिता तेलंगणा राज्यात खूप मोठ्या प्रमाणात पारवा ते पिंपळखुटी मार्गाने अदीलाबाद कडे वाहतूक सुरू असतांना पारवा ते पिंपळखुटी रोडने मंगी (सावरगांव) येथे अवैद्यरित्या गोवंशीय जनावरांची कत्तली करीता तस्करी करणाऱ्या घेवुन जाणा-या दोन ईसमांना व गोवंश तस्करी करीता वापरलेले पिकअप वाहनास सापळा रचुन एकुण 6 गोवंशीय जनावरांना पारवा पोलीसांकडुन जिवनदान देण्यात आले. कारवाई दरम्यान 2,67,000 रूपयाचा मुद्देमाल पारवा पोलीसांनी जप्त केला आहे.

पारवा पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दोन ईसम पारवा ते पिंपळखुटी रोडने अदिलाबाद जिल्ह्यात तेलंगणा येथे कत्तली करीता गोवंशीय जनावरे घेवुन जात आहे, अशी माहिती मिळाली त्यावरुन पारवा पोलीसांचे पथकासह मंगी (सावरगांव) येथे सापळा रचुन बैलांची तस्करी करणारे वाहन व त्यातील चालक व क्लीनर यास पारवा पोलीसांनी ताब्यात घेतले.

त्यांनतर पिकअप वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये एकुण 6 गोवंशीय जनावरे हे दाटीवाटीने भरून त्यास आखुड दोरीने बांधलेले व हालचाल करण्यास कुठलीही पुरेशी जागा न ठेवता बंदिस्तरित्या तसेच त्यांना खाण्यासाठी चारा, पाण्याची सोय न करता वेदनादायक स्थितीत मिळुन आले. त्यांची त्या वाहनातुन सुटका करून त्यांना चारा पाण्याच्या सोयीकरीता ग्रामपंचायत कार्यालय, पारवा यांचे ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई दरम्यान गोवंशीय बैल जातीचे एकुण 6 जनावरे अंदाजे किंमत 67 हजार रूपये व पिकअप वाहन गाडी क्रमांक TS 01 UA 7628 अंदाजे किंमत 2 लाख रूपये असे एकुण 2 लाख 67 हजार रूपयाचा मुद्देमाल मिळुण आला.

आरोपी मोंहम्मद अखील मोंहम्मद सरवर (वय 22 वर्ष), मोंहम्मद अथर मोंहम्मद ईकबाल हुसेन (वय 32 वर्ष) दोन्ही रा. शांतीनगर, अदिलाबाद (तेलंगणा) असे असुन त्यांचे विरूध्द पारवा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 403 / 23 अंतर्गत प्राण्यांना कु्रतेने वागविण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम, महाराष्ट्र प्राणीरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुश जगताप, पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांचे मार्गदर्शनाखाली पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण लिंगाडे, पोलीस उप निरीक्षक बालाजी ससाणे, जमादार लखन राठोड, जमादार अविनाश मुंढे, पोकाॅ गिनगुले, वाढई, पावसेकर यांनी पार पाडली.सदर गुन्हयाचा पुढील तपास जमादार अविनाश मुंढे हे करीत आहे.