Home यवतमाळ घाटंजीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांना स्वेच्छानिवृत्ती परवानगीचे आदेश..!

घाटंजीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांना स्वेच्छानिवृत्ती परवानगीचे आदेश..!

150

( अयनुद्दीन सोलंकी )

————————–
घाटंजी : घाटंजी येथील तत्कालीन ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनिष शांताराम दिवटे यांची स्वेच्छानिवृत्ती अर्ज महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी स्वेच्छानिवृत्ती होण्यास परवानगी दिली आहे.
तथापि, मनिष दिवटे हे घाटंजी येथे ठाणेदार असतांना अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकीस आनले होते. तसेच त्यांनी अवैध धंद्यांना पुर्णतः आळा घातला होता, हे विशेष. दरम्यान, मनिष दिवटे हे यवतमाळ येथील सायबर सेल शाखेत कार्यरत होते.

दरम्यान, घाटंजीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार मनिष शांताराम दिवटे यांनी 11 एप्रिल 2023 रोजी शासकीय सेवेतुन स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी प्रदर्शित केलेल्या इच्छेनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम 1982 मधील नियम 65 (1) मधील तरतुदीस अधिन राहुन पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांना 10 जुलै 2023 पासुन शासकीय सेवेतुन स्वेच्छा निवृत्ती होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी पोलीस अधीक्षक यवतमाळ व पोलीस निरीक्षक मनिष शांताराम दिवटे यांना तसे कळविले आहे.