Home मराठवाडा पत्रकार संरक्षण समिती पाथरीच्या अध्यक्षपदी शेख सिकंदर तर उपाध्यक्ष पदी मो. खुर्शीद...

पत्रकार संरक्षण समिती पाथरीच्या अध्यक्षपदी शेख सिकंदर तर उपाध्यक्ष पदी मो. खुर्शीद शेख

103
0

पाथरी – प्रतिनिधी

परभणी , दि. ०४ :- जिल्हातील तालुका पाथरी येथे पञकार संरक्षण समितीची बैठक शासकिय विश्राम गृह पाथरी येथे आज दि. 03/02/2020 रोजी आयोजित करण्यात आली होती . पत्रकार संरक्षण समिती पाथरी 2019 कार्यकारिणीचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली .

तालुका अध्यक्ष पदी शेख सिंकदर शेख हाफिज तर उपाध्यक्ष पदी मो. खुर्शीद मो. शफी शेख यांची निवड करण्यात आली. पञकार संरक्षण समितीचे संस्थापक / अध्यक्ष विनोद पत्रे साहेब यांच्या सूचनेनुसार परभणी जिल्हाअध्यक्ष अहमद अन्सारी व जिल्हा सचिव शेख अजहर यांच्या अध्यक्षतेखाली व सर्वानुमते निवड करण्यात आली . यावेळी मावळते अध्यक्ष शेख नदीम शेख रशीद तांबोळी यांनी आपल्या पदाची जबाबदारी नवनिर्वाचित अध्यक्ष शेख सिकंदर यांच्याकडे सोपवली . यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की समितीच्या ध्येय धोरणाला एकनिष्ठ राहून शासन दरबारी पत्रकारांच्या समस्या मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष शेख यांनी दिली.
यावेळी पञकार संरक्षण समीतीचे सर्व सभासद व पदाधिकार उपस्थित होते . या निवडीचे सर्व स्तरावरून अभिनंदन व आनंद व्यक्त होत आहे.

Unlimited Reseller Hosting