Home मराठवाडा त्या वादग्रस्त विधान प्रकरणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर कार्यवाही करा –

त्या वादग्रस्त विधान प्रकरणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर कार्यवाही करा –

52
0

वंचित बहुजन आघाडी ची मंगणी…!

सययद नजाकत

जालना , दि. ०४ :- जालना जिल्ह्यातले माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे महिलांमध्ये तिव्र नाराजी असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिपक डोके यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवदेन सादर करण्यात आले आहे.
माजी मंत्री लोणीकर यांनी परतुर येथे एका कार्यक्रमात बोलतांना शेतकर्‍यांच्या मोर्चात नेतृत्व करण्यासाठी हिरोईनला बोलवू आणि कोणी नाही आले तर तहसिलदार या हिरोईन सारख्याच दिसतात असे बोलून त्यांच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य आ. लोणीकर यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे त्यांरा राज्यभरातुन जाहिर निषेध होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
लोणीकर यांच्यावर कारवाई झाली नाही तर ते यापुढेही असेच वक्तव्य करतील त्यांच्या मनात महिलांबद्दल कोणताही आदर दिसून येत नाही. त्यांनी केवळ तहसिलदार यांचाच नव्हे तर संपुर्ण स्त्रियांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर दिपक डोके, अ‍ॅड. अशोक खरात, अ‍ॅड, कैलास रत्नपारखे, शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, विष्णू खरात, ज्ञानेश्वर जाधव, परमेश्वर खरात, मैनाबाई खंडागळे, रमाबाई होर्शीळ, शालीनी शर्मा, शेख रजिया बेग, शिल्पा विर, संतोष आढाव, विलास नरवडे, बाबासाहेब बाळराज, सागर खंडागळे दादाभाऊ भालमोडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.