Home यवतमाळ पाटीपुरा सॉफ्टबॉल लीग स्पर्धा संपन्न….

पाटीपुरा सॉफ्टबॉल लीग स्पर्धा संपन्न….

148

यवतमाळ स्थानिक पाटीपुरा येथे, नगरपरिषद शाळा नंबर 5 चे बाजूला असलेल्या कर्डक मैदानात, लॉर्ड बुद्धा फेस्टिवल अंतर्गत एक दिवसीय सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या एक दिवसीय स्पर्धेला सकाळी सुरुवात करण्यापूर्वी रीतसर या स्पर्धेचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा सकाळ समूहाचे प्रमुख राजूभाऊ भितकर, ज्येष्ठ धावक शेलार मामा यांचे हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये संघांच्या चाचणीच्या स्पर्धा सर्वप्रथम घेण्यात आल्या, या प्रथम स्पर्धेमध्ये लीग मॅचेस खेळल्या गेल्या. त्यातून चार मुख्य संघ काढून, त्या चार संघांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक “ग्रिजली” या संघाने पटकाविले तर, दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक “गरुडा” या संघाने पटकविले. तसेच तृतीय स्थानावर “ब्लु आर्मी” हा संघ राहिला. या तीनही संघांना मोठे पारितोषिक विजयी चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अनुक्रमे सुवर्ण, रजत व कांस्यपदकांनी सुद्धा सन्मानित करण्यात आले. या तीनही संघांना सामाजिक कार्यकर्ते उमेश मेश्राम यांचेकडून पारितोषिके उपलब्ध केल्या गेली. तसेच उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट झेल पकडणाऱ्या खेळाडूंना सुद्धा उमेश मेश्राम यांचे सहकार्याने रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून, यवतमाळ तहसील चे तहसीलदार योगेश देशमुख, सॉफ्टबॉल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष विकास टोणे, प्रा. नरेंद्र फुसे, जिल्हा सॉफ्टबॉल प्रशिक्षक किशोर चौधरी, पियुष चांदेकर, सुरज घोडे, पंकज शेलोटकर, प्रा. संदीप चावक, रितेश मुन, दिलीप तामगाडगे, विजय धुळे, तसेच या लीग सामन्यांचे आयोजक भाकीत मेश्राम हे उपस्थित होते.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू भाकीत मेश्राम यांनी केले. तर स्पर्धा आयोजनाच्या यशस्वीतेसाठी रोहित मेश्राम, दीपक गजभिये, कर्वेष जुनघरे, ओजस सुखदेवे, रत्नशिल डोंगरे, प्रदीप कैकाडे, सागर भुजाडे, सम्यक गजभिये, रोहंशू खंडारे, ऋषिकेश रामटेके, जगदीश गजभिये यांनी अथक परिश्रम घेतले.