Home यवतमाळ घाटंजी तालुक्यातील आमडी येथे सलोखा योजनेंतर्गत शेतजमिनीचा ताबा..!

घाटंजी तालुक्यातील आमडी येथे सलोखा योजनेंतर्गत शेतजमिनीचा ताबा..!

78

यनुद्


अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी – महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देण्याबाबतचा शासन निर्णयानुसार शेतजमीनीचा ताबा व वहिवाटी बाबत शेतकऱ्यांचे आपापसातील वाद मिटविण्याचा व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्यांच्या नावांवरील शेतजमीनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्यांकडे व दुसऱ्या शेतकऱ्यांचा नावावरील शेतजमीनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क 1,000 /- व नोंदणी फी 1,000 /- आकारणी बाबत सवलत देणाऱ्या सलोखा योजना राबविण्याचा उपक्रम महसूल विभागाकडून सुरु आहे.

या योजनेंतर्गत घाटंजी तालुक्यातील आमडी येथील माजी सरपंच थावरसिंग चव्हाण व पांडू चव्हाण यांना अदला बदलीचा सलोखा लेखाचा नोंदणीकृत दस्तावेज परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा घाटंजीचे तहसीलदार गोपाल देशपांडे यांचे हस्ते शिरोलीचे मंडळ अधिकारी अनिल येरकर यांचे उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. यासाठी आमडी येथील प्रभारी तलाठी भारत लढे यांनी परिश्रम घेतले.