Home मराठवाडा चाईल्ड पोर्नोग्राफी लहान मुलांचे विडिओ अपलोड करणारे दोघे जेरबंद

चाईल्ड पोर्नोग्राफी लहान मुलांचे विडिओ अपलोड करणारे दोघे जेरबंद

22
0

जिन्सी पोलिसांची कारवाई

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०१ :- चाईल्ड पोर्नाेग्राफीचे व्हिडीओ सोशल मिडियावर लोड करून व्हायरल करणा-या दोन जणांना जिन्सी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने गजाआड केले. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी चाईल्ड पोर्नाेग्राफी अपलोड करण्यासाठी वापरण्यात येणारे मोबाईल जप्त केले असल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी शनिवारी (दि.१) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अकबर सय्यद हाजी (वय ३६, रा. रशिदपुरा, हिनानगर), विजय विनायक सरोदे (वय ३६, संजयनगर, बायजीपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांनीही आपल्या मोबाईलवरून चाईल्ड पोर्नाेग्राफी असलेले अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त निशीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, डीबी पथकाचे उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहाय्यक फौजदार रफी शेख, जमादार संजय राठोड, भाऊसाहेब जगताप, हारूण शेख, संजय गावंडे, थोरात, शेख गणी, सुनील जाधव, गणेश नागरे, प्रविण टेकले आदींनी चाईल्ड पोर्नाेग्राफीचे व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड करणा-या दोघांच्या मुसक्या आवळल्या.