Home वाशिम प्रशांत नाईक यांची वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी निवड

प्रशांत नाईक यांची वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी निवड

118

अमरावती / धामणगांव रेल्वे –  दि.02/02/2023रोजी विश्रामगृह धामणगांव रेल्वे येथे पक्षाचे सर्वेसर्वा मा. बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रेखाताई ठाकूर, युवा आघाडी चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निलेश भाऊ विश्वकर्मा यांच्या आदेशानुसार अमरावती जिल्हा अध्यक्ष मा. अशोकजी मोहोड यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकारणी सभेत धामणगांव तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे पूर्व विभागाचे जिल्हा अध्यक्ष मा. अशोकजी मोहोड यांनी तालुका अध्यक्ष पदी प्रशांत नाईक व तालुका महासचिव पदी योगेंद्र पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असलेले प्रशांत नाईक यांची तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे.
तालुका कार्यकारणी गठीत करते वेळी धामणगांव रेल्वे तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी चे सुरेंद्र फुसाटे, सिद्धार्थ दहाट,सुरज वानखेडे,अनिल भुरभुरे,विजय मून, अशोक कांबळे,स्वप्नील कांबळे, भूषण पाटील, राहुल बन्सोड, किशोर राऊत,तुळशीराम रामटेके,राजेंद्र ढोके,विलास हेंडवे,अमित फुलझेले,आशिष गावंडे, पवन जाधव, छत्रपती शिंगणापुरे,लीलाधर मेश्राम, कैलास माथडे,शंकर सयाम असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.