Home यवतमाळ घाटंजी तालुक्यातील खापरी येथील मातोश्री विजयाताई बेलोरकर विद्या मंदिर येथे स्नेह संमेलन...

घाटंजी तालुक्यातील खापरी येथील मातोश्री विजयाताई बेलोरकर विद्या मंदिर येथे स्नेह संमेलन उत्साहात साजरा..!

219

( अयनुद्दीन सोलंकी )

————————-
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील खापरी येथे अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात खापरी येथे मातोश्री विजयाताई बेलोरकर विद्या मंदीरात दोन दिवसीय स्नेह संमेलनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरूवात शिक्षकांनी दिंडीपर नृत्यसादर करून केला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विश्वजित बेलोरकर आणि श्रीमती वर्षाताई बेलोरकर हे अध्यक्ष म्हणून लाभले. तसेच उपसरपंच देवकुमार शेंडे, ग्रामपंचायत सदस्य अंकित भोयर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संखेने पालक उपस्थित होते. प्रथम दिवस सूत्र संचालन कु. पूनम भोयर, & सौ. दिपाली कामडी. यांनी केले. तसेच नंतर संचालनाची धुरा सौ. अश्विनी कावडे व कु. पल्लवी गोडे यांनी सांभाळली.

या कार्यक्रमाला सौ. छाया लिलारे, मंगेश अवधूतकार , सौ. संगीता अवचित, सौ. प्रीती इंगोले, कु. पायल गोफने, सौ. अदिती भुरे, सौ. मेघा गावंडे, कु.मंजुषा रामटेके, सौ. प्रीती बोंद्रे, कु. प्रियांका दुधे, कु. मनीषा पांगुळ, सौ. सीमा कामठकर, सौ. वैशाली कर्णेवार, सौ. वैशाली राठोड, कु. अंजली कुंभारे, कु. कोमल उप्पलवार, सौ. प्रतीक्षा साबापुरे, सौ. उषा बेस्कर, श्रीमती. शोभा साबापुरे, श्रीमती माधुरी गिरी, आकाश बोबडे आदीं उपस्थित होते.अखेर सौ. लीलारे मॅडम यांच्या आभार प्रदर्शन पर भाषणाने सुंदर अशा संम्मेलनाची सांगता करण्यात आली.