
पारवा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयूक्तीक कारवाई
पारवा येथे आज दि .३.२.२०२३ रोजी पोलीस स्टेशन पारवा येथे दिनांक २.२.२०२३ रोजी तक्रारदार श्रीमती मीरा ज्ञानेश्वर शेंडे वय ६० रा. इदिरानगर , पारवा ता घाटंजी जिल्हा- यवतमाळ याचे तक्रारीवरून त्याचे रहाते बंद घराचे अज्ञात रोरट्याने कूलूप तोडून घरात प्रवेश करून घरातून सोन्याची चैन रू २०००० / – अंदाजे ५ ग्राम , रोख रक्कम रू १० ते १२ हजार टीव्ही सॅमसंग कंपनीचे रू ५००० / – चिल्लर रू ३००० / – असे एकूण ४०००० / किमतीचे एवज चोरीस गेलेला आहे . सदर घरफोडीचे गून्हा जेष्ठ नागरिक एकटे राहत असलेले ठिकाणी असलेने व आरोपीचे रूमाल हा घटनास्थळी मिळून आल्याने आज बाजूला विचारपूस करून घराचे अवती भवती पाळत ठेवणारे इसमांचे बाबत गोपणीय माहिती काढून कसोशीने शोध घेतला असता सदर गून्हा हा आरोपी शिवा महादेव नेहारे वय २६ , रा. इदिरानगर पारवा ता घाटंजी जिल्हा – यवतमाळ , विठ्ठल प्रभाकर मरसकोल्हे वय ३२ रा. इदिरानगर पारवा ता. घाटंजीज जिल्हा- यवतमाळ यांनी केलेला असलेचे निष्पन्न झालेने त्यांना सदरच्या गुन्हात अटक करण्यात आलेली आहे . जेष्ठ नागरिक एकटी महिला रहात असलेले ठिकाणी झालेली घरफोडीचे महत्व ओळखून मा. पोलीस अधिक्षक डॉ पवन बन्सोड सो यांचे सूचने नूसार स्थानिक गुन्हे शाखा पथक देखील पारवा येथे दाखल झालेले होते . सदर संयुक्त कारवाई मध्ये घरफोडीचा गुन्हा तात्काळ २४ तासांत उघडकीस आणलेला आहे . चोरीला गेलेला माल हस्तगत करणे व तपासाची प्रक्रीया सूरू आहे . तपास पोहवा / १ ९ ७ सूरेश येलपूलवार करत आहेत तसेच सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पवन बन्सोड सो , अपर पोलीस अधिक्षक श्री पियूष जगताप साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , पांढरकवडा श्री प्रदिप पाटील , स्थानिक गून्हे शाखेचे प्रदिप परदेशी यांचे सूचना व मार्गदर्शणात पारवा पोलीस स्टेशनचे टाणेदार सा. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण , पोउपनि बालाजी ससाणे , पोहवा , २ ९ ४ लखन राटोड , पोहवा , १ ९ ७ सूरेश येलपूलवार , पोहवा , ९ ५१ संदिप महाजन , पोशी , २४८८ राहूल उईके , पोशी , २५७० अमोल वाढई पोशी , २३१५ अनिल गिनगूले , पोहवा , प्रफूल पावसेकर सर्व नेमणूक पो स्टे पारवा व स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी पोउपनि , योगेश रंधे पोहवा , नरेश राऊत , नापोशी , सुधिर पिदूरकर सर्व नेमणूक स्थानिक गून्हे शाखा यवतमाळ यांनी संयूक्तीकरित्या पार पाडली…!











































