Home जालना Nojoto सोशल मिडिया फेम… कवि कृष्णा वाघमारे यांचा सत्कार

Nojoto सोशल मिडिया फेम… कवि कृष्णा वाघमारे यांचा सत्कार

64

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव येथील कृष्णा वाघमारे यांनी लिहिलेल्या कविता Nojoto indian Poetry सोशल मीडिया च्या माध्यमातून सेकंदाचे शाॅर्ट व्हिडिओ व रिल च्या जमान्यात पाच ते दहा मिनिटांच्या त्यांच्या कविता ला 1K ते 1M पेक्षा जास्त विवर्स आसने हे कौतुकास्पद आहे. संपूर्ण भारत देशात त्यांच्या कवितांचे लाखो चाहते असुन त्यांच्या नवीन रचनेची वाट पहातात व लाईक, कमेंट, गिफ्ट ची बरसात करतात. स्वतः च्या नावा बरोबर कुंभार पिंपळगाव चे नाव प्रोफाइल ला लावून गावाचे नाव संपूर्ण भारत देशात रोशन केले आहे. फार कमी दिवसात आज त्यांच्या समाज प्रबोधन व देशभक्ती कविता ला (10M)दहा मिलियन पेक्षा जास्त विवर्स पुर्ण झाले आहेत. हि कुंभार पिंपळगाव साठी आभिमानास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. या वेळी श्री मोगरे सर, श्रीहरी जगताप, आकाश आर्दड, विलास काळे, मधुकर दहीवाळ, वसंत पवार, संतोष बोटे, रयुफ भाई, भारत फुटाणे, यश कंटुले, गणी भाई, पीसुळे या सह आनेकानी त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.