Home जालना व्यापारी महासंघाच्या वतीने पत्रकार, ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच,सदस्यांचा सत्कार.

व्यापारी महासंघाच्या वतीने पत्रकार, ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच,सदस्यांचा सत्कार.

159

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील व्यापारी महासंघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त सोमवारी,९ जानेवारी रोजी,पत्रकार व कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले, सचिव आतुल बोकन, यांच्यासह व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, जेष्ठ पत्रकार विष्णुदास आर्दड, इब्राहिम पठाण, दिगंबर गुजर लक्ष्मीकांत कुलकर्णी, लक्ष्मण बिलोरे, किशोर शिंदे, अशोक कंटूले, राजकुमार वायदळ, संतोष गबाळे,राजकुमार वायदळ,गणेश ओझा, नितीन तौर, संभाजी कांबळे, विठ्ठल काळे , अजय गाढे, बाळासाहेब व्यवहारे, भागवत बोटे, कुलदीप पवार, कौतिक घुमरे,परवेज पठाण, नवनाथ मोगरे, तसेच सरपंच सौ संगिताताई गंगाधर लोंढे, उपसरपंच आबासाहेब राऊत, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ चव्हाण, विजय कंटुले, हरिभाऊ कंटुले, राधाकृष्ण भालेकर, संदीप कंटुले, रफीकभाई कुरेशी, मतिन शेख,संचालक शिवाजी कंटुले, फिरोज कुरेशी, मजहर पठाण, विठ्ठल राऊत, भगवान शिंदे, भागवत कंटुले, प्रकाश बिलोरे, प्रभाकर शिंदे,भगवान शिंदे आदींचा व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी, पत्रकार दिगंबर गुजर, गंगाधर लोंढे , व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यापारी महासंघाचे प्रकाश कंटुले, दिनेश लाहोटी, रफिक कुरेशी, संदीप जत्ती, माऊली उढाण, विजय कंटुले, ज्ञानेश्वर तापडिया, अंकुश कंटुले, योगेश घोगरे, जगदीश बजाज, शाम राऊत, माजेद पठाण, प्रल्हाद तांगडे, निलेश तौर, शाहेद शेख, अनिल मुंदडा, रियाज शेख, बबलु देशमुख, कृष्णा सुरासे,अक्षय चांङक एकनाथ पोकळे, ज्ञानेश्वर दहिवाळ, अमित पंडा, हरूनभाई शेख, शेख हमीद, पवन राठी, नय्युम अत्तार, महेश गुजर, दामोदर कंटूले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे हरून भाई शेख यांनी केले तर सुचसंचालन राजकुमार वायदळ यांनी केले तर विजय कंटुले यांनी सर्वांचे आभार मानले.