Home यवतमाळ घाटंजी येथील ॲड. क्रांती विजेश मुनोत जैनोलॉजीमध्ये प्राविण्य यादीत..!

घाटंजी येथील ॲड. क्रांती विजेश मुनोत जैनोलॉजीमध्ये प्राविण्य यादीत..!

113

( अयनुद्दीन सोलंकी )

————————-
घाटंजी : घाटंजी येथील प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक संदिप मूनोत व ॲड. रुपेश मुनोत यांच्या सुन व प्रा. डॉ. विजेश मुनोत यांच्या सहचारिनी ॲड. क्रांति विजेश मूनोत यांनी आदिनाथ जैन ट्रस्ट चुलै चेन्नईद्वारा आयोजित व संचालित , ‘जैन धर्म दर्शन’ या प्रतिष्ठेच्या अभ्यासक्रमामध्ये संपूर्ण भारतात गुणानुक्रमाने चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे चेन्नई येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित पदवीदान समारंभात त्यांना रजत पदक व पदवी प्रमाणपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. सदर अभ्यासक्रम तीन वर्षाचा असून त्यामध्ये जैन इतिहास, तत्वमिमांसा, आचारमिमांसा, कर्ममिमांसा, सुत्रार्थं इत्यादींचा समावेश आहे.

भगवान महाविरांची वाणी, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य चा संदेश सामान्य लोकापर्यंत पोहचेल अशा सोप्या व सरळ शब्दामध्ये सदर अभ्यासक्रमाची आखणी केली गेली आहे. या आधी विवाहानंतर क्रांति मुनोत यांनी संसाराची सर्व जबाबदारी पार पाडत असताना एल. एल. बि., व एल. एल. एम. या परीक्षाही विशेष प्राविण्यासह उतीर्न केल्या आहे. जैन धर्म दर्शन पाठ्यक्रमानंतर प्रतिष्ठित
‘तत्वार्थंसूत्र’ या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी प्रवेश निश्चित केला असून आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा मानस ॲड. क्रांती मुणोत हिने व्यक्त केला आहे.

त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आदिनाथ जैन ट्रस्टचे डॉ. मोहनजी जैन, डॉ. निर्मलजी जैन, त्यांच्या सासूबाई श्रीमती
चंचलदेवी मुनोत, आई, वडील, दोन्ही जाऊ व समस्त मुनोत परिवारास दिले आहे. या यशामुळे घाटंजी तालुक्यासह इतरत्र त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.