Home जालना तिला जन्मदात्या बापानेच मारले अन , जाळून ही टाकले ,?

तिला जन्मदात्या बापानेच मारले अन , जाळून ही टाकले ,?

220

बापास अटक ,

 

अमीन शाह ,

मुलगी घरी काहीही न सांगता घरातून निघून गेल्याने समाजात अपमान झाल्याचा राग मनात धरून चक्क बापाने मुलीला फाशी देऊन जाळून अंत्यविधी केल्याची धक्कादायक घटना आज जालना जिल्ह्यातील पिंपळगाव या गावी समोर आली आहे . याबाबत चंदनझिरा पोलीस ठाण्यात मुलीचा बाप संतोष भाऊराव सरोदे व भाऊ नामदेव भाऊराव सरोदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की , आज दिनांक 14/12/2022 रोजी राजुर रोडवर चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोउपनि पोहार , पोउपनि झलवार , पोना चव्हाण , पोना देशमुख , पोहेकॉ जितेंद्र तागवले पेट्रोलिंग करत असतांना त्यांना पिरपिंपळगाव शिवारामध्ये संतोष भाऊराव सरोदे या व्यक्तीने त्याच्या मुलीचा मयत झाल्याने परस्पर अत्यंविधी करून पोलीसांना कोणतीही खबर न देता विल्हेवाट लावली असल्याची माहिती मिळाली होती . त्यावरून पोलिसांनी पिरपिंपळगावचे पोलीस पाटील बावणे यांना संपर्क करून त्यांचेसह संतोष भाऊराव सरोदे यांच्या शेतातील वस्तीवर जावून संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे यांना मिळालेल्या माहितीच्या संबंधाने विचारपुस केली . त्यावेळी त्यांनी मुलगी नामे सुर्यकला ऊर्फ सुरेखा संतोष सरोदे ( वय 17 वर्ष ) ही मागील दोन तीन दिवसांपूर्वी घरुन निघुन गेली होती .
ती मंगळवारी ( दि . 13 ) रोजी दुपारी घरी आली आल्यानंतर वडिलांनी तीस विचारपुस केली असता तिने बापा सोबत वाद घातला ती आम्हास काही न सांगता घरातुन निघून गेल्याने आमचा अपमान झाला होता .गावात बदनामी झाली त्यावरुन दुपारी 04.00 वा च्या दरम्यान तिला कडुलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास देवुन जिवे ठार मारले आहे . नंतर संध्याकाळी तिला जाळुन टाकुन अत्यंविधी केल्याचे सांगीतले . त्यावरुन पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता पोल्टी फॉर्मच्या लगत अत्यंविधी केल्याचे तसेच राख पोत्यात भरून ठेवल्याचे आढळून आले . त्यावरून पोहेकॉ जितेंद्र तागवले यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे यांच्याविरुद्ध भादवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत ,