
यवतमाळ – अमरावती येथुन लग्न सोहळ्या आटपून परत येत असताना कार आणि एस टी बसची समोरासमोर धडक लागून. चार जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार चालू आहे.
विस्तारित वृत्त असे की अमरावती येथून विवाह सोहळा आटपून परत येत असताना कार आणि एसटी बसची समोरासमोर धडकून यामध्ये कार मधील चार जण जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. याशिवाय बसमधील दोघे जण जखमी असून यवतमाळ च्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. अपघाताची ही घटना रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास यवतमाळ अमरावती मार्गावर नेरच्या लोणी गावा जवळ घडली.
रजनी अशोक इंगोले, राधेश्याम अशोक इंगोले (चालक) वैष्णवी संतोष गावंडे सारिका प्रमोद चौधरी सर्व रा. यवतमाळ व कनेरगाव जि.वाशिम असे मृतांची तर साक्षी प्रमोद चौधरी (17) रा. पिंपळगाव पुसद, प्रमोद पांडुरंग चौधरी, सविता संतोष गावंडे, सचिन नारायण शेंद्रे रा.यवतमाळ धनंजय माधव मिटकरी, असे अपघातातील जखमींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गावंडे व चौधरी कुटुंब हे दिनांक 3 डिसेंबरला सायंकाळी अमरावती येथे लग्न सोहळ्यानिमित्त गेले होते. दरम्यान आज लग्न सोहळा आटपून अमरावती येथुन यवतमाळ कडे येत असताना हा भीषण अपघात झाला.