Home मराठवाडा दत्त जयंती जन्मोत्सोवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ,गुरुचरित्र पारायण

दत्त जयंती जन्मोत्सोवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ,गुरुचरित्र पारायण

145

घनसावंगी -लक्ष्मण बिलोरे

जालना – श्री स्वामी समर्थ सप्ताहिक केंद्र आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) कुंभार पिंपळगाव ता घनसावंगी जि जालना येथे श्री दत्त जयंती जन्मोत्सव निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व भव्य सामुदायीक गुरूचरीत्र पारायणास प्रारंभ झाला आहे


1डिसेबर ते 8 डिसेंबर पर्यंत सप्ताह होणार आहे या सप्ताहात मंडल स्थापना अग्नीस्थापना स्थापित देवता हवन नित्यस्वहाकार गणेश याग मनोबोध याग गिताई चंडीयाग स्वामी याग रुद्र याग मल्हारी याग तसेच रोज सप्ताह काळामध्ये त्रिकाल आरती 8 वाजता भुपाळी आरती 10:30व 6:30 वाजता नैवेद्य आरती तसेच श्री दुर्गा सप्तशती श्री स्वामी चरित्र मल्हारी सप्तशती पाठ मंत्र स्वामी मंत्र गायत्री मंत्र नवार्ण मंत्र महामृत्युंजय मंत्र इत्यादी सेवा होतात गुरुचरित्र पठण 57 नवनाथ 1 भागवत 1 श्रीपाद श्रीवल्लभ 1 असे एकूण 60 सेवेकरी पठण करतात तसेच बुधवारी दिनांक सात रोजी बली पूर्णाहुती व 12:39ला दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे तसेच दिनांक 8गुरूवार रोजी सत्यदत्त पूजन 10:30 च्या आरतीने सप्ताहाची सांगता होईल महाप्रसाद मांदीयाळीने साजरा होणार आहे री जास्तीत जास्त भाविक सेवेकर्‍यांनी लाभ घ्यावा असे आव्हान केंद्र प्रतिनिधी सौ .किरण रविंद्र तौर यांनी केले आहे.