Home बीड नवरीला नवरा नाही आवडलं अन , विपरितच घडलं , ???

नवरीला नवरा नाही आवडलं अन , विपरितच घडलं , ???

318

 

 

नव विवाहितेस अटक ,

अँड , ताज महोम्मद अन्सारी

 

गेवराई , जी , बीड

पती आवडत नसल्यानं लग्नानंतर दोन आठवड्यातच पत्नीकडून पतीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे . बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे . 8 नोव्हेंबर रोजी गेवराई मधील पांडुरंग चव्हाण यांची हत्या झाली होती . हत्ये नंतर पांडुरंग यांच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयावरून त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी सुरू केली होती . अखेर आज संशयित पत्नीने पोलिसांना आपणच पांडुरंग यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली . त्यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय . शीतल चव्हाण असं संशयित आरोपी पत्नीचं नाव आहे . गेवराई पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला
. मिळालेल्या माहिती नुसार बीडमधील गेवराई तालुक्यामधील निपाणी जउळका येथील पांडुरंग चव्हाण या तरुणाचा विवाह शितल या तरुणीशी 14 नोव्हेंबर रोजी झाला होता . मात्र लग्नापासूनच शितलला पांडुरंग पसंद नसल्याने त्यांच्यात घरामध्ये सतत वाद होत असत . पांडुरंगच्या कुटुंबीयांनी अनेक वेळा शीतलची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला . मात्र शितलच्या वागण्यात काही बदल न झाला नाही , असं पांडुरंग याच्या कुटुंबीयांनी सांगितलं .

8 नोव्हेंबर रोजी पांडुरंग याला अस्वस्थ वाटू लागल्याने गेवराईच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं . यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून त्याच्या गळ्यावर काही व्रण असल्याची माहिती पोलिसांना दिली . यावरून आणि पांडुरंगच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून त्याची पत्नी शीतल हिच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि संशयित शितलला पोलिसांनी ताब्यात घेतलां होतं . गेवराई पोलिसांनी शीतल हिला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे कसून चौकशी केली असता तीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचं कबूल केलं . शितलने मध्यरात्री पती पांडुरंग याचा गळा दाबून त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करत रुग्णालयात दाखल केलं असल्याचं पोलिसांना सांगितलं .

हृदयविकाराचा बनाव ,

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जउळका येथील पांडुरंग रामभाऊ चव्हाण या 22 वर्षीय तरुणाचा काही दिवसापूर्वीच विवाह झाला होता . 7 नोव्हेंबर रोजी रात्री पांडुरंग यांना हृदयविकाराचा झटका आला . त्यामुळे त्यांना गेवराईच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं . यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं . मात्र अचानक त्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी गेवराई पोलिस ठाण्यामध्ये त्याच्या पत्नीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती . संशयावरून पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं होतं . कसून चौकशी केल्यानंतर तिने हत्येची कबुली दिली आहे . परंतु , स्वतः गळा दाबून हत्या केली आणि हृदयविकारानेच त्यांचा मृत्यू झाला असा बनाव करण्यात आला होता . परंतु , अवघ्या आठ दिवसाच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पत्नीनेच पतीचा खून केल्याचे उघड केले .घडलेल्या या गुन्ह्याचा योग्य तपास केल्या मुळे गेवराई पोलिसांचा प्रशनशा केली जात आहे ,