
यवतमाळ -: शहरातील तहसील चौकाजवळ असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या गेट समोर धावत्या इंडिया विस्टा एम एच 29 एडी-0242 ने अचानक पेट घेतल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली तसेच गाडीचा स्फोट होण्याच्या भीतीने परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने तात्काळ बंद केली.
यवतमाळ शहरातून प्रवास करताना तीन प्रवासी घेऊन जात असलेल्या इंडिका विस्टा मधील इंजिन मध्ये अचानक पेट घेतल्याने वाहन चालकाने सतर्कता दाखवीत धावत्या गाडीला रस्त्याच्या कडेला लावले व त्यामध्ये झोपून असलेल्या व्यक्तीस तात्काळ उठून तिघेही बाहेर पडले या सतर्कतेमुळे सुदैवाने जीवित हानी टळली.आरटीओ कार्यालयात कार्यालयातील नोंदीप्रमाणे हे वाहन शेख नजरू इस्लाम यांच्या नावे असून या वाहनाचा इन्शुरन्स फेब्रुवारी 2022 रोजी संपल्याचे समजते.मात्र या परिसरात घडलेल्या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.या संदर्भात यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे.











































