
यवतमाळ – कुटुंबातील सदस्यांची दिवाळी ही अन्य सर्वांसारखी व्हावी, तसेच या परिवाराचे स्वास्थ्य निरोगी राहावे या सामाजिक व निस्वार्थ उद्देशाने वीर शिवाजीराजे प्रतिष्ठान तर्फे दीपावली निमित्त धान्य, दीप, फटाके आदी जीवनावश्यक साहित्य भेट स्वरूपात देण्यात येत असते.

यासाठी दरवर्षी एका अत्यंत गरजू कुटुंबाची निवड करून त्यांना हे साहित्य देण्यात येते. या वर्षी धामणगाव रोड वरील मादनी या गावातील एका कुटुंबाची निवड करण्यात आली. या कुटुंबियांना आज दि. २१ ऑक्टोबर रोजी प्रतिष्ठानतर्फे तांदूळ, गहू, तेल, साखर, तुर डाळ, चना डाळ, तिखट, हळद, चहा पावडर, दिवा – पणती आदि साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव राहुल राठी, उपाध्यक्ष अतिष देशमुख आदिन्नी पुढाकार घेतला. सोबतच प्रभारी उपाध्यक्ष कौस्तुभ मोहदरकर, सर्व सदस्य निरज येवतीकर, सागर लाकडे, अक्षय भोयर, आकाश राठी, पियुष राठी, प्रतिक शर्मा, डॉ. सुरज काळे, तन्मय अवसरे, अश्विन मोहदरकर, शेखर बनकर, संतोष लोणारे, लोकेश गोंडे, कुणाल ठाकरे, अमोल ढोमणे, निखिल मिठे, स्वप्निल डगवार, शुभम पाटील, सागर बोबडे, विकास गडचीलवार, यश खडतकर, राधेय तांबेकर, प्रज्वल वाजे हे उपस्थित होते. तसेच मादनीचे सरपंच श्री गजानन कैकाडे, उपसरपंच श्री देवा टेकाम, सचिव रामटेके साहेब, राजपाल नागराळे, जगदीश बर्डे आदि गावातील नागरिक उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमासाठी ज्यांनी निःस्वार्थपणे सहकार्य केले अश्या सर्वांचे व गावातील नागरिकांचे वीर शिवाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद ओमप्रकाश अवसरे यांनी आभार मानले.











































