Home कोल्हापूर कोल्हापूरात कोंबडीनं दिलं देशातील सर्वात मोठं अंडं

कोल्हापूरात कोंबडीनं दिलं देशातील सर्वात मोठं अंडं

315

कोल्हापुर:{आनंद पाटील}
कोल्हापूरची एक कोंबडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या कोंबडीने देशातील सर्वात मोठं अंडं दिलयं. या अंड्याचे फोटो सगळीकडे व्हायरल होतांना दिसत आहे.
ही कोंबडी कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे गावातील आहे. येथील दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमध्ये हे अंडं मिळालंय. विशेष म्हणजे हे अंडं केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रातील नाही तर चक्क देशातील सर्वात मोठं अडं आहे, असा दावा केला जात आहे.

या अंड्याचं वजन 210 ग्रॅम इतकं आहे. सामान्यपणे कोंबडीच्या अंड्याचं वजन 70-75 ग्रॅमपर्यंत असतं. त्यामुळे हे अंडं आता सर्वांचेच लक्ष वेधत आहे.