Home यवतमाळ यवतमाळ जिल्हासाठी मिळाले नवीन पोलीस अधिक्षक

यवतमाळ जिल्हासाठी मिळाले नवीन पोलीस अधिक्षक

705

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यासाठी गौरव सिंह हे नवीन एस पी मिळाल्याची माहिती मिळाली आहे.गौरव सिंह हे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे 1990 ला जन्मलेले आणि हिमाचल प्रदेशच्या 2013 चे सर्वात तरुण आयपीएस अधिकारी आहेत . त्यांनी अवैध दारू व खनन माफियावर कडक कारवाई केल्याने बरेच चर्चेत राहिले व हिमाचल प्रदेश मध्ये केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा होता आणि या दौरा दरम्यान कुल्लू येथे 23 जून ला मुख्यमंत्र्याच्या सेक्युरिटी इन्चार्जला चापट मारण्याच्या प्रकरणात सस्पेंड ही झालेले आहेत .एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते . त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये सिंगम म्हणून आदर केला जातो . ते जनतेचे लोकप्रिय पोलीस अधिकारी म्हणून गणले जातात . आता ते यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत . त्यांचा ही कार्यकाळ मा . पोलीस अधिक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील साहेबा प्रमाणेच यशस्वी राहील अशी आशा करू या …!