Home वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने काळयाबाजारात विक्री करीता गहु घेवुन जाणारा ट्रकसह ६.५२ लाखा...

स्थानिक गुन्हे शाखेने काळयाबाजारात विक्री करीता गहु घेवुन जाणारा ट्रकसह ६.५२ लाखा चा मुददेमाल केला जप्त

124

 

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे काळया बाजारात जाणारा गहु, तांदुळ विक्री करणाच्या इसमांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करून वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत सर्वांना आदेशित केले आहे.


दिनांक १६/१०/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, पो स्टे अनसिंग हददीतुन एका ट्रक मध्ये अवैधरित्या गहु वाहतुक
होत आहे. अशा खबर वरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथक सपोनि प्रमोद इंगळे, पोहवा किशोर चिंचोळकर,दिपकं सोनावणे, पोना अमोल इंगोले, प्रविण राउत, पोकॉ संतोष शेणकुडे यांना आदेशीत करून नमुद माहीती प्रमाणे कार्यवाही करणे कामी पोस्टे अनसिंग हददीत रवाना केले.सदर बातमीप्रमाणे पोस्टाफ च्या मदतीने अनसिंग पुसद रोडवर पाटील धाब्याजवळ नाका बंदी करून संशयास्पद येणारा ट्रक क्र. एम एच २९ टी १६०७ ला थांबवुन त्यास नाव गाव विचारले असता चालक/ मालक इम्रानखान अब्दुल रहेमान खान व इतर एक रा. खतीब वार्ड पुसद जि. यवतमाळ यास गाडीमध्ये काय आहे असे विचारले असता गहु धान्य असल्याचे सांगीतले त्यास माला बाबत कागदपत्राची मागणी केली असता काटा पावती सोडुन कोणत्याही प्रकारचे कागद पत्र नसल्याने सदरचा ट्रक मधील गहु धान्य २३९ क्विंटल किं ६,५२,४७० रू चा गहु व ट्रक किं २५००००० रू असा एकुण ३१,५२,४७० रू चा गहु धान्य काळया बाजारात जाणारा जप्त करून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस स्टेशन आसेगांव येथे जमा करण्यात आला. पुढील कायदेशीर कार्यवाही कामी तहसिलदार वाशिम यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे.तसेच या व्यतीरीक्त सन २०२२ मध्ये विविध पोस्टे अंतर्गत एकुण ११ केसेस मध्ये ६१,९२,५३५ रू चा अवैधरित्या काळयाबाजारात विक्री करीता जाणारा गहु व तांदुळ जप्त करण्यात आला आहे.सदर कारवाईत मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सपोनि सपोनि प्रमोद इंगळे, पोहवा किशोर चिंचोळकर, दिपक सोनावणे, पोना अमोल इंगोले, प्रविण राउत, पोकॉ संतोष शेणकुडे यांनी सहभाग नोंदविला. नमुद गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा वाशिम हे करीत आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206