Home यवतमाळ जागतिक अंध दिनानिमित्त राजूभाऊ पडगीलवार यांच्या हस्ते प्रदर्शनी उदघाटन

जागतिक अंध दिनानिमित्त राजूभाऊ पडगीलवार यांच्या हस्ते प्रदर्शनी उदघाटन

307

यवतंाळ – आज रोजी आर्णी रोड येथे “चौधरी आयुर्वेद व संशोधन केंद्र”यांचे कार्यालय व निर्मिती फाउंडेशन यांची प्रदर्शनी मा.उमेश धोटे(एक अंध व्यक्ती) व मा.राजूभाऊ पडगिलवार साहेब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
जागतिक अंध दिनानिमित्त मा.उमेश धोटे हे एक सर्व सामान्य व्यक्ती असून ते आपले कुटुंब म्हणजे पत्नी व आई यांच्या सांगे भाड्याने राहतात,आज हा व्यक्ती कोणावरही अवलंबुन न राहता वयक्तिक रित्या खेळणी विकून आपला उदरनिर्वाह करतो तसेच घराचे भाडेही देतो अश्या स्वावलंबी व्यक्तीचा मान राखून व समाजात अश्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आज “चौधरी आयुर्वेद व संशोधन केंद्र,निर्मिती फाउंडेशन”यांच्या कमिटीने हा निर्णय घेतला की,उमेश धोटे यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन व वनौषधींची प्रदर्शनी यांचे उदघाटन मा.राजूभाऊ पडगिलवार साहेब यांच्या हस्ते मामा-भांजे चे दुकान,आर्णी रोड येथे घेण्यात आले…हा कार्यक्रम मा.डॉ.विनोद देशमुख साहेब,आयुष अँड पॅरामेडिकल असो.महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच आपले मानवाधिकार फाउंडेशन अध्यक्ष, वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला..दरम्यान,मा.भाऊराव चौधरी-सेवानिवृत्त अधिकारी,मा.प्रदीपसिंग ननरे-माजी जिल्हा द्वी समादेशक,ऍड.धर्मेंद्र चौधरी, डॉ.निखिल मानकर,मा.हनुमानदास साहू,सौ.स्मिताताई भोईटे,सौ.सायली चौधरी,डॉ.सुधीर भोईटे,देवानंद चौधरी, अशोक आत्राम,मा.उईके साहेब,सुरेश चौधरी,राजेन्द्र चचाने,राजेंद्रकुमार दुधकोर-संचालक निर्मिती फाउंडेशन इ.उपस्थित होते…आभार प्रदर्शन डॉ.विवेक चौधरी यांनी केले.