Home राष्ट्रीय शिव‌ – सेनेचा धनुष्यबाण’ चिन्ह नेमकं कोणाचं होणार?

शिव‌ – सेनेचा धनुष्यबाण’ चिन्ह नेमकं कोणाचं होणार?

244
0

 

चिन्हाचा लढा शेवटच्या टप्प्यात…!

नवी दिल्ली :-राज्यात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सुरु असणारे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हासाठीचा संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण उद्या म्हणजे 7 तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होत आहे. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची आज कायदेशीर लढाई बाबत वकिलांसोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आयोगात प्राथमिक रिप्लाय आज सादर करायचा की उद्या यावर बैठकीत विचार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आयोगामध्ये प्राथमिक रिप्लाय दिल्यानंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी शिवसेना वेळ मागण्याची शक्यता आहे. जवळपास सहा ते सात लाख अॅफिडेव्हिट सादर करायचे असल्याने वेळ मिळावा ही विनंती आयोगाला केली जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केस सुरू असताना चिन्हाबाबात निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे. या दरम्यान अंधेरीची पोटनिवडणूक देखील जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन उद्या निघणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्यापासून सुरू होणार आहे. या काळात चिन्हाचा निर्णय काय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण चिन्हाबाबत केस आयोगाच्या दारात पोहचल्यानंतर लगेच निवडणुका असतील तर अनेकदा चिन्ह तात्पुरते गोठवले गेल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या केसमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होतेय का हे पाहावं लागेल. आज ठाकरे गटाकडून काय बाजू सादर होते यावर हा निर्णय अवलंबून असणार आहे.

चिन्हाची केस मुळात आयोगासमोर अजून नीट आलेलीच नाही. अजून दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाची स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा ठाकरे गटाचा दावा आहे. तर शिंदे गटाचा दावा आहे की, विधीमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहचला आहे. लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असले तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलंही जाण्याची शक्यता आहे.

Previous articleभदोही दुर्गा पंडाल आगजनी में दर्शनार्थियों की निर्मम मृत्यु की घटना की शिकायत राष्ट्रीय मानवाधिकार के समक्ष
Next articleअंबाडी येथे भक्तिमय वातावरणात व शांततेत दुर्गा देवीचे विसर्जन संपन्न.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here