Home महत्वाची बातमी अंबाडी येथे भक्तिमय वातावरणात व शांततेत दुर्गा देवीचे विसर्जन संपन्न.

अंबाडी येथे भक्तिमय वातावरणात व शांततेत दुर्गा देवीचे विसर्जन संपन्न.

504

 

नांदेड:-(पोलिसवाला ऑनलाईन वृत्तसेवा) बालाजी सिलमवार

अंबाडी येथे सार्वजनिक दुर्गा महिला मंडळ यांच्यावतीने दुर्गा देवीचे मोठ्या उत्साहात स्थापना करून नवरात्रात विधिवत नऊ दिवस पूजा अर्चा,आरती करून रोज सायंकाळी महिला देवीसमोर दांडिया खेळून उत्सव साजरा करण्यात आला.दुर्गा मंडळाचे अध्यक्षा श्रीमती ममताबाई सिलमवार उपाध्यक्ष विमलबाई जुनघरे आणि सचिव दिपाली जैस्वाल,कविता जोगुलवार यांनी अतिशय चांगल्या प्रकारे उत्सवासाठी नियोजन केले होते.


देवीच्या मूर्ती स्थापनेच्या दिवशी श्री क्षेत्र माहूर गडावरील रेणुका मातेजवळून दीप ज्योत आणून श्रद्धापूर्वक अंबाडी येथे देवी जवळ लावण्यात आले.यासाठी मा.सरपंच श्रीमती सरिकाताई सिलमवार,माथूराबाई पडलवार,सुमनबाई जुनघरे,तुळसाबाई बावणे, हरणाबाई चव्हाण, कुसुमबाई जाधव,कमलाबाई मुराडवार, चंद्रकलाबाई मुराडवार,गंगाबाई संदुलवार, पदमाबाई पैडीपेल्ली वार,कमलाबाई नैताम,चंद्रकलाबाई खामनकर,लिंगम्मा मिसालवार,शोभाबाई कालुंके, सोमबाई आत्राम,अनिता सिडाम आदीं महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात नवरात्रामध्ये सहभाग नोंदविला.
शेवटच्या दिवशी किनवट पोलिस स्टेशन अंतर्गत बिट जमादार श्री पुंडलिकराव बोंडलेवाड व प्रकाश बोधमवाड,वाघमारे आदींनी दिलेल्या सूचनेनुसार अंबाडीमध्ये शांततेत ढोल ताशांच्या गजरात गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढून भक्तिमय वातावरणात देवीचे विसर्जन करण्यात आले.यावेळी राजुभाऊ सिलमवार,गुणाजी पडलवार,परमेश्वर मुराडवार,अक्षय पांडलवार, गजु बावणे,व्यंकटी संदुलवार,मधुकर पैडीपेल्लीवार,बालाजी सिलमवार, विद्याधर तामगाडगे,माधव गेडाम,ज्ञानेश्वर चव्हाण,निलेश कोत्तपेलिवार,किसन आडे,विजय धडांजे,मनोज मिसलवार, अशोक पेडीपेलिवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.