Home यवतमाळ “भाई अमन आपच्या वाटेवर” , काँग्रेस मधील अंतर्गत कलहामुळे भाई अमन नाराज

“भाई अमन आपच्या वाटेवर” , काँग्रेस मधील अंतर्गत कलहामुळे भाई अमन नाराज

174
यवतमाळ प्रतिनिधी -: सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे वारे वाहत असताना काही महिन्यापूर्वी यवतमाळ येथील तसेच संपूर्ण विदर्भात व्हाईट टायगर म्हणून परिचित असलेले भाई अमन यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभेची निवडणूक लढणार असे जाहीर केले होते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा भाई अमन स्वतंत्र आघाडी करून लढणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.याच अनुषंगाने भाई अमन येणाऱ्या काळात आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्वामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.भाई अमन हे कट्टर काँग्रेसचे असून सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याने ते नाराज असल्याचे बोलल्या जात आहे.या कारणाने ते काँग्रेस सोडून आम आदमी पार्टीच्या वाटेवर असल्याचे बोलल्या जात असून दि. 20 तारखेला दिल्ली येथे अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्वामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचेही बोलल्या जात आहे.
सध्या जनता वाढती महागाई, बेरोजगारी,सर्वसामान्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न याकडे सर्वच राजकीय पक्ष दुर्लक्ष करत असून मूळ प्रश्नांकडे डोळेझाक केल्या जात असल्याने यांना पर्याय म्हणून जनता आम आदमी पार्टीकडे पाहत आहे. दिल्ली व पंजाब मधील सत्ता परिवर्तनाचे वारे पाहता महाराष्ट्रातही परिवर्तन होईल असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांना दिसत आहे.यामुळे निष्ठावंत पक्षावर अवलंबून असलेले मतदार आता वेगळा पर्याय निवडणार असे दिसत आहे.