Home यवतमाळ वॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी चिमुकल्यांना शिष्यवृत्ती देऊन केला स्वातंत्र्य अमृत महोत्सव...

वॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी चिमुकल्यांना शिष्यवृत्ती देऊन केला स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा….

488
यवतमाळ / बेलोरा –  अलीकडे बंद मनाची धारे उघडण्याची खटपट सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. अनेक जुनी मित्रमंडळी एकत्रित येऊन छोट्या-मोठ्या मैफिली रंगवतानाची चित्र दिसून येत आहे. अशाच एका बेलोरा ता. जी. यवतमाळ येथील छोटेश्या जिल्हा परिषद शाळेतील 35 वर्षांपूर्वीच्या मित्रांनी व्हाट्सअप ग्रुप वर एकत्रित येऊन जुन्या आठवणीना उजाळा दिला. सुख सुविधांचा सर्व बाजूंनी अभाव, अत्यंत छोट्या वसतिगृहात राहून घेतलेले शिक्षण, अश्या असंख्य आठवणींचा प्रवास सर्वांच्या शब्दातून चित्रित होऊ लागला… ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र अमृत महोत्सव निमित्त शिष्यवृत्ती देण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला तो डॉ. किशोर मानकर , वन संरक्षक ( C.F.) गडचीरोली आणि त्यांच्या मित्रांनी…
1986-87 च्या काळात दहाव्या वर्गात शिकणाऱ्या सर्व बालमित्रांनी अथक परिश्रम घेऊन आपल्या जीवनाच्या अंधाराचा चिरछेद करीत उजेडाच्या दिशेने धाव घेतली… ह्या उजेड वाटेवर असताना ही विखुरलेली फुले पुन्हा भेटली… ह्या सर्वांना एकत्रित बांधणारा धागा होता ती म्हणजे आपली शाळा… ज्या शाळेने आपल्या डोळ्यात उजेडाचे स्वप्न पेरले त्या शाळेचा प्रकाश अजूनही आपल्याला खुणावतो आहे, असे सर्वांना वाटू लागले. प्रज्ञेची पायवाट दाखवणाऱ्या आपल्या शाळेच्या माध्यमातून आपण आपला स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करावा असे सर्वांना वाटू लागले… एक एक कल्पना पुढे येत गेल्या त्यातूनच पुढे आले उत्कृष्ठ गुण मिळविणाऱ्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती देवून गुणगौरव करण्याची कल्पना….!
………. ……डॉ. किशोर मानकर CF गडचिरोली यांनी आपले मित्र मिलिंद भगत इंजिनियर तथा आफ्रिका कंपनी डायरेक्टर, डॉ. राजकुमारी दंदाले, प्रियदर्शनी मंडवाल मुख्याध्यापिका न. प. शाळा नेर , राजकीय व उद्योग क्षेत्रात असलेले श्री सुभाष अतकर, ऑईल इंडस्ट्रीज चे संचालक व राजकीय व्यक्तित्व राजेश पाटील,आरोग्य विभागात कार्यरत असलेले अशोक डोमाळे, इंटेरियल डेकोरेटर प्रमोद अवझनकार, शिक्षकी पेशा बरोबर उत्कृष्ट गायक व प्रबोधनकार पुरुषोत्तम मेश्राम, उत्तम नचपेलवार, ह्या बरोबर च गृहिणी राहून ज्यांनी आपल्या मुलाबाळांना उच्च पदस्थ अधिकारी बनविले त्या मध्ये मीनाक्षी कोंडलिकर, नलिनी वडस्कर, नीलिमा मानकर,वनिता मानकर,सीमा गिरी, अरुणा गिरी, ह्या सोबतच हनुमंत भवरे,संजय राऊत,हरिहर खैरे,अशोक तिरीमल्लू, काचगुंडे, गजानन गुघाने, गजानन भारती हे सर्व मित्र एकत्रित येऊन
आपली कल्पना प्रत्यक्षात उतरवायचे ठरविले. व्हाट्स अप ग्रुप मध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला. ह्या माजी विद्यार्थांनी स्वातंत्र्य अमृत महोत्सवच्या निमित्याने पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले की, ‘ त्यावेळी बरेच विद्यार्थी बाहेरगावाहून वसतिगृहात राहायला यायचे, एकच खोली,एकच किचन… ह्या मध्ये अनेक विद्यार्थी राहायचे, कोणी ही कुणाबद्दल कधी तक्रार केली नाही. इतका प्रेम जिव्हाळा आमच्यात असायचा… प्रचंड दारिद्र्य, सुखसुविधाचा अभाव अश्या स्थितीत आम्ही शिक्षण घेतले. वसतिगृहाचे सुपरवायजर बलदेव सिंग, किचन मास्टर कांताबाई ह्यांनी आमच्या खाण्यापिण्याची कधी आबाळ होऊ दिली नाही, हागवणे शिपाई स्वच्छ पांढरी टोपी, सदरा, धोतर ह्या पेहरावाने परिचित होते , ते आमच्या साठी दररोज बहिरमकर यांच्या लांब असलेल्या विहिरीवरून डोक्यावर पाणी आणायचे. त्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक शेरकर सर, दुधे सर,जयस्वाल सर, मोगरकर सर,लोखंडे सर, भुराने सर,गिरोलकर मॅडम,हरदास सर, कांबळे सर,राठोड सर, पातूर्डे सर, हे सर्व गुरुवर्य आपल्या विषयातील तज्ज्ञ होते, यां सर्व गुरुजनानी आमच्या ज्ञानाची दार उघडी केली…’
स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त जी. प. माध्यमिक शाळा बेलोरा ता जी. यवतमाळ येथील वर्ग दहावा मधून प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्या मधून प्रथम पारितोषिक संकेत प्रीतम कांबळे ह्यांना श्री मिलिंद भगत , आफ्रिकेतील कोंगो ह्या देशात खनिज कँपणीत वाणिज्य संचालक पदावर कार्यरत यांचे तर्फे आई इंदुबाई मुकीदराव भगत यांचे स्मृती प्रित्यर्थ रोख रक्कम दहा हजार रुपये,त्यांचे बेलोरा येथे राहणारे वर्गमित्र व प्रगतशील शेतकरी गजानन भारती यांचे हस्ते देण्यात आले. द्वितीय पारितोषिक संकेत कृष्णा गावंडे यांना डॉ. किशोर मानकर, भावसे ( वन संरक्षक गडचिरोली) यांचे तर्फे आई मैनाबाई सोनबाजी मानकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ रोख रक्कम नऊ हजार रूपये मैनाबाई मानकर बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष आनंदराव मानकर यांचे हस्ते देण्यात आले. तृतीय पारितोषिक अंजली कृष्णा मेश्राम यांना प्रियदर्शनी मधुसूदन मंडवाल यांचे तर्फे मधुसूदन मंडवाल सर यांचे स्मृती प्रित्यर्थ रोख रक्कम आठ हजार रुपये वर्गमित्र गजानन गुघाणे यांचे हस्ते देण्यात आले. तर चतुर्थ पारितोषिक समृद्धी विलास बन्सोड यांना नलिनी माणिकराव वडस्कर यांचे तर्फे माणिकराव वडस्कर यांचे हस्ते रोख रक्कम चार हजार रूपये देण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत सामजिक जबाबदारी जपत हा देखणा स्वातंत्र्य अमृत महोत्सव सोहळा जी. प. माध्यमिक शाळा बेलोरा ता. जी. यवतमाळ येथे पार पडला.