Home महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन ठाणे शहर अध्यक्ष पदी राहुल खैर यांची नियुक्ती

पोलीस बॉईज असोसिएशन ठाणे शहर अध्यक्ष पदी राहुल खैर यांची नियुक्ती

215
0

 

ठाणे : दिनांक 15 / 08 / 2022 पोलीस बॉईज असोसिएशन ठाणे शहर अध्यक्ष पदी येथील पोलीस बॉईज असलेले राहुल दत्ताराम खैर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे.

राहुल खैर हे मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक चे संस्थापक अध्यक्ष असून राज्यातील गडकिल्ले यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांची संपूर्ण टीम मैदानात उतरली असून गेली 14 वर्षांपासून ते या क्षेत्रात काम करण्यासाठी अग्रेसर आहेत. त्यांना या कामासाठी अनेक सामाजिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत , तसेच राहुल खैर यांचा सामाजिक कार्यात सुद्धा पुढाकार असतो , ठाणे शहरातील पोलीसांच्या मदातीलही ते धाऊन जातात व पोलीसांच्या अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो.

त्यामुळे पोलीसांबद्दल असलेली आत्मीयता पाहून व त्यांच्या या कामाची दाखल घेऊन पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी राहुल खैर यांची पोलीस बॉईज असोसिएशन ठाणे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleदिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या धारावी कट्टा चित्रपटाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
Next article“भाई अमन आपच्या वाटेवर” , काँग्रेस मधील अंतर्गत कलहामुळे भाई अमन नाराज
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here