
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यात गेल्या हप्ताभरापुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणी तालुक्यातुन गेलेल्या नदी नाल्यांच्या पुरामुळे नदिकाठच्या शेतीचे खुप नुकसान झाले.अनेकांचे पिके खरडुन गेलीत,शेतकर्यांनी मेहनतीने फुलवलेले पिके पावसाच्या पाण्यामुळे आणी पुरामुळे ऊभे पिके पाण्यात गेलीत,तर बहूतांश पिके पाण्यामुळे खराब होवुन मोठे आर्थीक नुकसान झाले.सरकारने जरी शेतकर्यांना ठोस मदतीचे आश्वासन दिले परंतु अजुनही प्रत्यक्ष मदत पदरी पडली नाही तसेच महसुल विभागालाही अजुनही स्पाॅट पंचनाम्याचे मुहुर्त कधी सापडणार?या प्रतिक्षेत शेतकरी दिसत आहेत.यासोबतच ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले हे शासकीय मदतीपासुन वंचित राहु नये ही खबरदारी घेणे गरजेचे आहे.जिल्हा प्रशासनाने आतातरी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी ऊभे राहुन ठोस मदत करावी अशी मागणी होत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206











































