Home यवतमाळ स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबीरात 96 युवक-युवतींनी केले रक्तदान

स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबीरात 96 युवक-युवतींनी केले रक्तदान

181

 

यवतमाळ – आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त एस.के. ऑटोडील मित्र परिवाराच्या वतीने दिनांक 15 ऑगस्ट रोजी शिवशक्ती लॉन स्टेट बँक चौक यवतमाळ येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन एस.के. ऑटोडील चे संस्थापक रामचरण परिहार, युवा उद्योजक शैलेश परिहार, प्लाक्क्षा मनिष अहिर, संजय मंत्री, यांनी दिपप्रज्वलन व भारत मातेचे पुजन करुन रक्तदान शिबीराला सुरुवात केली.

या रक्तदान शिबीरामध्ये जवळपास 96 युवक-युवतींनी रक्तदान केले. तर अनेक युवक-युवतींनी याप्रसंगी रक्तदानाचा संकल्प व्यक्त केला. या रक्तदान शिबीरामध्ये वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीच्या चमुने रक्तसंकलनाचे कार्य केले. या रक्तदान शिबीरामध्ये लायनेस क्लब यवतमाळ ईनरव्हिल क्लब ऑफ ज्वेल्स, यवतमाळ ब्लड डोनर असोसिएशन, यवतमाळ, टी.डब्ल्यू.जे. ग्रूप, वसुंधरा फाउंडेशन यवतमाळ, नारि रक्षा समिती यवतमाळ, हनुमान मंदिर भक्त मंडळ, महेश्‍वरी महिला मंडळ, यवतमाळ, हनुमान मंदिर गणेश मंदिर चौक यवतमाळ, निक्की चव्हाण फ्रेन्ड्स ग्रुप, क्रिडा भारती सायकलींग ग्रुप, सिंहझेप समर्पण सखी यवतमाळ, स्वामिनी महिला मंडळ यवतमाळ, जय हिंद दुर्गादेवी उत्सव मंडळ यवतमाळ, मास्क क्रियेटीव्ह क्लब ऑफ यवतमाळच्या अनेक कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान केले. या रक्तदान शिबीराला लोकप्रीय तहसिलदार कुणाल झाल्टे, मुख्याधिकारी माधुरी मडावी, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब मांगूळकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, शिवसेना यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळे, ओबीसी मोर्चाचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र डांगे, निरज वाघमारे, अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, गोविंद शर्मा आदि मान्यवरांनी या रक्तदान शिबीराला सदिच्छा भेट दिली. तर रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी शिबीराचे संयोजक शैलेश करिहार, सतिष राठोड, रवि ढगे, बाळासाहेब सज्जनवार, सुधिर कैपिल्यवार, राहुल पत्रिवार, गणेश कोवे, इनरव्हिल क्लब ऑफ ज्वेल्स च्या अध्यक्षा प्रतिभा पवार, सचिव अबोली डिक्कर देशमुख आदिंसह रक्तदान समितीचे पदाधिकारी प्रयत्नशिल होते.