
————————-
सुशांत आगे – पुणे
————————-
कसल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसतांना उच्च्चसुशिक्षीत असलेले नितीन नाईकनवरे यांनी अल्पावधीतच केलेल्या विकासकामांतुन स्वकर्तृत्वावर विवीध पदे भुषवित माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळा ठसा युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवत कर्तृत्वाने लोकप्रिय झालेले नेते म्हणुन आज त्यांची ओळख आहे. नितीन | नाईकनवरे यांच्या
वाढदिवसानिमीत्त त्यांच्या व्यक्तीमत्वावर टाकलेला लेख.शेतकरी कुटुंबामध्ये नितीन नाईकनवरे यांचा जन्म झाला. वडिल किशनराव नाईकनवरे हे सोळंके महाविद्यालयामध्ये कार्यालय अधिक्षक म्हणून कार्यरत होते. नितीन नाईकनवरे यांनी एमएस्सी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन जिवनांपासुनच विवीध जाती धर्माच्या विद्यार्थी मित्रांना एकत्रित करत सलोख्याचे संबंध निर्माण केले आहेत. शहरालगतच असलेल्या रेणापुरी या पुनर्वसित गावातुन ग्रामपंचायत सदस्याची निवडणुक लढवत राजकीय जिवनास सुरूवात केली. प्रचंड मताधिक्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणुन विजयी झाल्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांचे नेतृत्व मान्य करत १९९५ ते २०१७ पर्यंत काम केले. आमदार सोळंके यांचे कट्टर समर्थक म्हणुन नितीन नाईकनवरे यांनी एक आपली वेगळी ओळख निर्माण केली. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाची निवडणुक लढवत संचालक म्हणुन निवडुण आले. यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांना उपसभापती पदाची संधी दिली. यानंतर दोन वेळेस बाजार समितीचे सभापती म्हणुन त्यांनी उल्लेखनिय असे कार्य केले. येथील जुन्या मोंढ्यामध्ये असलेल्या जागेच्या अडचणींमुळे शेतकरी, व्यापा-यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असे. कृषी उत्पन्न बाजार समितीची असलेल्या फुलेपिंपळगाव येथील जागेमध्ये व्यापान्यांना प्रशस्त जागेत सर्व सुविधा उपलब्ध करून देत मोंढ्याचे स्थलांतर करण्यात आलेतरया मोंढ्या शेजारीच टीएमसी प्रकल्पही उभारण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन शेतमाल घेउन येणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपयांत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली तर शेतकरी वर्गाला प्रेरणा मिळावी या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हरीत क्रांतीचे प्रणेते कै. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे स्मारक उभारले. दुष्काळी परिस्थितीमध्ये आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांना आर्थिक मदत केली तर तालुक्यातील जनावरांसाठी चारा छावणी उभा करत शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. शहरात व ग्रामीण भागात पिण्याचे पाणी साठवण्याकरीता मोफत टाक्यांचे वाटप केले तर बाजार समिती परिसरात वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरीता वनवे ट्राफिक उपक्रम राबविला तर पन्नास वर्षांमध्ये सिंदफणा नदीपात्रात वाढलेली झाडी झुडपे लोकसहभागातुन व पत्रकार संघाच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबविली. स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करत अंत्यसंस्कारां साठी येणाऱ्या लोकांकरीता बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातच नाही तर संपूर्ण शहरात व महत्वाच्या व रहदारीच्या ठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे वसुवन नागरिकांच्या सुरिक्षततेची काळजी घेण्यात आली. मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेसाठी दुरवर असलेल्या स्मशानभूमीपर्यंत जाण्याकरीता स्वर्गरथाची सुविधा उपलब्ध करण्यात आली.
शहरासह ग्रामीण भागामध्ये युवकांचे संघटन करत शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा सातत्याने नितीन नाईकनवरे यांचा प्रयत्न राहिलेला आहे. २०१७ नंतर वढील किशनराव नाईकनवरे यांना कारखाना निवडणुकीत विश्वासात न घेता परस्पर डावलले याची खंत वाटल्याने किशनराव नाईकनवरे व नितीन नाईकनवरे या पिता पुत्रांनी तात्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. प्रितम मुंडे, आमदार आर. टी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश करत कसल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आजातागायत अविरतपणे भाजपा पक्षाने दिलेल्या कामाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. ग्रामपंचायत पासुन पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी नाईकनवरे यांनी आपली प्रतिष्ठा कायम पणाला लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. नाईकनवरे यांचे असलेले संघटन कौशल्य, त्यांच्या अंगी असलेली विकास कामे करण्याची दुरदृष्टीया जोरावर युवकांचे मोठे जाळे त्यांनी निर्माण केलेले आहे. आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…!











































