Home पश्चिम महाराष्ट्र नागरिकांनी घरोघरी तिरंगा लावावा – संजय नरवडे

नागरिकांनी घरोघरी तिरंगा लावावा – संजय नरवडे

129

 

१३ आँगस्ट ते १५ आँगस्ट पर्यंत तिरंगा प्रत्येक घरावर फडकणार .

—————————-
सुशांत आगे – पुणे
—————————-
ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतुन भारत देशाला मुक्त करण्यासाठी हजारो देशभक्तांनी आपल्या प्राणाची अहुती देत प्राण पणाने प्रयत्न केले , सशस्त्र क्रांतीच्या मार्गापासून ते अंहिशेच्या मार्गाचा अवलंब करून क्रांतिकारकांनी देश स्वतंत्र केला . क्रांती वीर व अनेक अंहिसेच्या समर्पित त्यागामुळेच आज भारतदेश स्वतंत्र आहे . या भारत स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत , याचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदिजी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात विविध कार्यक्रमाव्दारे अमृत महोत्सवी वर्षे उत्साहाने साजरे होत आहे .
बीड जिल्ह्यातील माजलगांव तालुक्यातील छोटेशे गांव माळेवाडी (सुलतानपुर) सारख्या छोटेशा गावात फक्त ४६६ घरे असून गावातील लोकसंख्या फक्त दोन हजाराच्या जवळपास असून ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच ,सदस्य , ग्रामसेवक यांच्या माध्यमातून संजय नरवडे यांच्या नेतृत्वाच्या सहकार्यातुन नव तरूणांनी अमृत महोत्सव वर्षे साजरे करण्यासाठी संपूर्ण गांव श्रमदानातून स्वच्छता अभियाण राबवले असून नागरिकांना घरोघरी तिरंगा झेंडा लावण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात नांव नोंदणी केली असून तिरंगाझेंडा लवकरच घरोघरी वाटप करणार आहोत असे सरपंच संजय नरवडे यांनी माध्यमांशी बोलताःना सांगितले .त्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतिने गावात प्रभात फेरी काढून घरोघरी तिरंगा लावावा , हा तिरंगा १३ आँगस्ट पासून १५ आँगस्ट पर्यंत लावावा आणि अमृत महोत्सवी वर्षे साजरे करूयात अश्या आशयाच्या घोषणा मुलांनी देऊन नागरिकांना अवाहन केले .तसेच जिल्हा परिषद शाळेने विशेष वेशभुषा साजरे करण्यात आले याकामी माळेवाडीकर यांनी विशेष प्रयत्न केले .
हर घर तिरंगा अभियानाचा संदेश सामान्य माणसा पर्यंत जावा म्हणून जन जागृती करण्यासाठी १३ आँगस्ट शनिवार रोजी तिरंगा रँली काढण्यात येणार असून या रँली मध्ये गावातील शिक्षक , विद्यार्थी , युवक, महिला आदि सर्व स्तरातील नागरिकांच्या सह भागातुन हि रँली संपन्न होणार आहे अशी माहिती सरपंच संजय नरवडे यांनी दिली .