
जनसेवा आणि देशसेवा करण्याचा या माध्यमातून मुख्य लक्ष – तप महर्षी अक्षय ऋषीजी म.सा.

यवतमाळ – आनंद वर्षावास समिती 2022 व जैन सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य गुरुदेव आनंद ऋषीजी म.सा. यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये तप महर्षी अक्षय ऋषीजी म.सा. यांनी सांगितले.
यावेळी अक्षय ऋषीजी म.सा. पत्रकारांसोबत बोलतांना म्हणाले की, वर्षावासाचे प्रत्येक वर्षी आयोजन करण्यात येते मात्र यावर्षी यवतमाळ येथे विशेष आयोजन करण्यात आले असून श्रमण संघाच्या वतीने साधना चतुर्मास तसेच एकाच ठिकाणी चार महिने राहून या पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त जीव जंतूची उत्पत्ती होत असते यामुळे आपल्या हातून कुठल्याही जीवजंतूचा नाश होऊ नये या उद्देशाने एका ठिकाणी राहण्यासाठी या वर्षावासाचे आयोजन करण्यात येत असते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यासह या वर्षावासामध्ये संत समागम, सूत्र संघटन, सेवा स्वाध्याय संघटन नसल्यास जनसेवा सेवा कार्य करता येत नाही, सोबतच संघटनासाठी एकत्र येऊन विविध जनसेवा तसेच सेवाकार्य हा या मागील उद्देश असून हिंसेपासून अलिप्त राहणे व्यवहारांमध्ये प्रामाणिकता ठेवणे कुणाचीही फसवणूक करणे न करणे तसेच संग्रह करून ठेवणे यापासून अलिप्त राहण्याचे यामध्ये सांगितल्या जाते तसेच या वर्षवासाच्या माध्यमातून संदेश दिला जातो की घरामध्ये प्रेम असल्यास घराचा स्वर्ग होतो. या मार्गातूनच समाजाचे कल्याण सुख शांती समाधान प्राप्त होते. तसेच जनसेवा आणि देशसेवा करण्याचा या माध्यमातून मुख्य लक्ष सांगितल्या जाते. यासह विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बोलतांना आंबील व्रतधारक अमृत ऋषीजी म.सा. यांनी राष्ट्रसंत आनंद ऋषीजी म.सा. यांच्या जन्मोत्सवानिमित्त दि. 22 जुलै रोजी तेला तप आराधना, तसेच 22 ते 29 जुलै पर्यंत अठाई तप महोत्सवा अंतर्गत सामुहिक 108 अठाई तप तसेच 24 जुलाई रोजी 1008 सामुहिक आयंबील तप महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नियमितपणे सामायीक स्वाध्याय, प्रार्थना, वंदना आदि उपक्रमांसह 28 जुलै रोजी विदर्भस्तरीय सामुहिक भक्तीगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अमृत ऋषीजी म.सा. यांनी दिली. पत्रकार परिषदेला जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा, उपाध्यक्ष जवाहर बोरा, प्रसिध्दी प्रमुख विजय बुंदेला, महिला समितीच्या सौ. चंंदा कोटेजा, शारदा गांधी, प्राध्यापीका कविता तातेड आवर्जून उपस्थित होत्या. आनंद जन्मोत्सवाकरीता विदर्भासह यवतमाळ जिल्ह्याच्या कानाकोपर्यातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा यांनी केले आहे.











































