Home वाशिम आमगव्हाणजवळच्या नदिपाञात आढळला मृतदेह..!

आमगव्हाणजवळच्या नदिपाञात आढळला मृतदेह..!

150

 

फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील आमगव्हाण नजीक अडाणनदीत एक अंदाजे 45–50 वर्ष वयाचा पुरुषाचा मृतदेह अंगात पांढरा पायजामा आणी पांढरे शर्ट पोटाला कपडा बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याची माहिती एक आंबा चे पोलीस पाटील चंद्रशेखर निर्मळ यांनी येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरूळपीर यांना माहिती देऊन तात्काळ येण्यासाठी सांगितले यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत यांना पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी माहिती दीली.

आणी शाहु भगत यांच्या आदेशाने लगेचच मंगरूळपीर पो.स्टेशनचे ठाणेदार सुनिल हुड,पिएसआय शेंबडे यांना माहीती देऊन मंगरूळपीर तहसील येथे तहसीलदार शितल बंडगर यांच्या सोबत दोन दीवसापापुन स्टॅण्डबाय असलेली संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरूळपीर टीम दहा मिनिटात घटनास्थळी पोहचुन काठावरील मृतदेह पोलीस पाटील यांच्या समक्ष ठाणेदार सुनिल हुड,सा.पो.नि.निलेश शेंबडे,पो.उ.नी.अंकुश वडतकर,स.फौ.सुभाष महाजन,पो.काॅ.जितेंद्र ठाकरे,उमेश ठाकरे यांच्या आदेशाने संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे अतुल उमाळे,गोपाल गीरे,अपूर्व चेके,गोपाल जयस्वाल, लखन खोडे,अजय आडे, रुपेश खंडारे,सुदर्शन काकड यांनी मृतदेह सुरक्षित स्थळी बाहेर काढला यावेळी मंगरूळपीर पो.स्टेशन चे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणी वनोजा येथील साळुंकाबाई आपत्ती व्यवस्थापन टीम सुद्धा घटनास्थळी पोहचली होती.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.