Home उत्तर महाराष्ट्र श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा२०२२

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा२०२२

139

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातून…!

 राजेंद्र भांड

त्रंबकेश्वर येथून पंढरपूर कडे निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडीचे श्रीरामपूर नगरीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले पंढरीनाथ महाराज की जय…. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय… विठ्ठल विठ्ठल जय हरी पाऊले चालती पंढरीची वाट… अशी सुश्राव्य भजने येथील बँड पथकाने गायन करत पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत केले रस्त्याच्या दुतर्फा काढलेल्या रांगोळ्या फुलांची उधळण लक्ष वेधून घेत होती. संगमनेर रोड श्रीरामपूर जुन्या जकात नाक्याजवळ शासनाच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी स्वागत केले. नॉर्दन ब्रांच पासून येथील स्थानिक भाविकांनी पालखी खांद्यावर घेतली वाजत गाजत हरिनामाचा जयघोष करत श्रीराम मंदिरामध्ये पालखी आली मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा प्रणिती गिरमे, यांच्यासह रोनक गिरमे, गौतम उपाध्ये आदींनी पालखीचे पूजन केले पालखी सोहळ्याचे मानकरी मोहन महाराज बेलापुरकर, जयंत महाराज गोसावी बाळकृष्ण महाराज यांचा दिंडी स्वागत समिती श्रीरामपूर यांच्या वतीने रमेश कोठारी यांनी सत्कार केला.

यावर्षी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असून त्रंबकेश्वर पासून श्रीरामपूर पर्यंत लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. यावर्षी पालखी सोहळ्यात ४८ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. यावर्षी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाला नाशिक जिल्ह्यातील मुरंबी येथील शेतकरी गजीराम मते यांची खिल्लारी बैल जोडी यांची सारथ्य करत आहे. तसेच पालखी ज्या ठिकाणी विसावा घेते त्या ठिकाणी रांगोळी काढून तसेच त्या रांगोळीतून सुंदर वारी निर्मल वारी यासह वेगवेगळे सामाजिक संदेश देत प्रबोधन करत राजेंद्र जुन्नरकर (आळंदी) हे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या ४७० किलोमीटर पालखी बरोबरच पायी प्रवास करत रांगोळीची सजावट विनामूल्य करत संत निवृत्तीनाथांच्या चरणी आपली सेवा रुजू करतात. पालखीचा आजचा मुक्काम अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे आहे. यावेळी पुंडलिक थेटे यांनी दिंडी सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रमाची माहिती दिली.