Home नागपूर आरक्षणविरोधी पक्षाच्या विरोधात सशक्त पर्याय उभारणार

आरक्षणविरोधी पक्षाच्या विरोधात सशक्त पर्याय उभारणार

198

बहुजन समाजातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या बैठकीत निर्धार”

वृत्त संकलन- धर्मेश दुपारे

नागपूर : राज्यातील चारही महत्त्वाचे पक्ष हे आरक्षणविरोधी आहेत. यांनी बहुजन समाजात फूट पाडून आपली राजकीय पोळी शेकली आहे. येणाऱ्या निवडणुकीत या प्रमुख राजकीय पक्षांच्या विरोधात सशक्त पर्याय उभा करण्यासाठी बहुजन समाजातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या ५० प्रतिनिधींची बैठक रवी भवनात पार पडली. बैठकीत महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवून प्रस्थापितांना धक्का देण्याचा निर्धार करण्यात आला.
कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीला मार्गदर्शक म्हणून माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार उपेंद्र शेंडे, प्रा. एन. व्ही. ढोके, रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे राष्ट्रीय सरचिटणीस देशक खोब्रागडे, जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष अशोकराव आल्हाट, कम्युनिष्ट पार्टीचे अरुण वनकर, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे हरिष उईके,भीम आर्मीचे संजय फुलझेले भाऊसाहेब बावणे, जनार्दन मुन,रा.स्व.सं, प्रा. रमेश राठोड, प्रा. मनीष वानखेडे,राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, ईंजि.सुषमा भड,राष्ट्रीय समाज पक्षाचे,दत्ता जी मेश्राम, धनराज मडावी गोंडवाना पार्टी,जिवन बागडे,रिपब्लिकन पार्टी,अतुल खोब्रागडे,खूप लढलो बेकीने ,आता लढू या एकीने,शामराव हाडके, सुनिल चोकरे,विदर्भ विचारमंच,गणेशफुलसुंगे, राष्ट्रीय जनता दल, सिध्दार्थ मरार,समता सैनिक दल,अशोक पाटील,विदर्भ पार्टी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले की, अन्यायातून निर्माण झालेली आमची ही लोकशाही आघाडी आहे. राज्यातील सरकारने आरक्षणाचे प्रश्न सोडविलेले नाहीत. राजकीय पक्षांच्या ओठात एक व पोटात एक असे असल्याने समाजालाआरक्षणापासून वंचित ठेवले. बहुजन समाजातील सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्ष एकत्र येऊन आम्ही सशक्त पर्याय निर्माण करणार आहोत. अरुण गाडे यांनी बाबासाहेबाांना अभिप्रेत असलेला राजकीय विचारधारा म्हणजे संविधाचे समता,बंधुत्व न्याय या तत्वावरच रिपब्लिकन पक्षाचे ध्येय धोरण आधारित आहे,हेच धोरण राबविल्यासच वंचिताना न्याय मिळेल,देशात समता प्रस्तापित होईल,देशाला वैभव प्राप्त होईल,पंरतु जोपर्यरंत समाजाचे नावावर दलाली, भडवेगिरी करणा-यावर वचक निर्माण करणार नाही तोपर्यंत राजकीय लढाई जिंकता येणार नाही असे मत व्यक्त केले .बैठकीचे प्रास्ताविक मधुकर उईके यांनी केले. सूत्रसंचालन धर्मेश दुपारे यांनी केले, तर सीताराम राठोड यांनी आभार मानले.