Home विदर्भ कृषी विभाामार्फत बनावट डिएपी खते जप्त

कृषी विभाामार्फत बनावट डिएपी खते जप्त

113

 

प्रतिनिधी -: धनराज खर्चान
अमरावती -:भातकुली तालुक्यात बनावट डिएपी खतांची विक्री होत असल्याचे गोपनीय माहिती चे आधारे जिल्हा भरारी पथकाद्वारे दिनांक 20/06/2022 रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल खर्चान यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. बनावट डिएपी ची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच कृषी विकास अधिकारी जी प अमरावती श्री जी टी देशमुख, श्री अजय तळेगावकर जिल्हा कृषी अधिकारी, श्री दादासो पवार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी , कु. अश्विनी चव्हाण , उध्दव भायेकर, पवनकुमार ढोमणे कृषी अधिकारी यांनी खारतळेगाव येथील शेतकरी यांचेशी चर्चा करून चौकशी केली असता सात शेतकर्यांनी बनावट खते खरेदी केले असल्याचे सांगितले. त्यावरून संबंधित सात शेतकरी यांच्या कडून तक्रार प्राप्त करून बनावट खत विक्री करणारे मिलिंद वानखेडे यांच्या विरुद्ध रा खते नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 व भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत वलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच उपलब्ध खताच्या ६३ पोते अंदाजे रक्कम ८८२००/- जप्त करण्यात आले. सदर कारवाईचे वेळी श्री अनिल खर्चान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री जी टी देशमुख कृषी विकास अधिकारी जी प , श्री अजय तळेगावकर जिल्हा कृषी अधिकारी जी प, श्री दादासो पवार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी , कु. अश्विनी चव्हाण , , पवनकुमार ढोमणे कृषी अधिकारी पं स भातकुली व उध्दव भायेकर कृषी अधिकारी प स अमरावती उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्या कडूनच खते खरेदी करून त्याचे पक्के बिल घ्यावे तसेच वरीलप्रमाणे कोणी व्यक्ती घरपोच कमी किमतीचे खते विक्री करत असल्यास त्या बाबत माहिती कृषी विभागास द्यावी असे आवाहन श्री अनिल खर्चान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व श्री जी टी देशमुख कृषी विकास अधिकारी जी प अमरावती यांनी केले आहे.