Home जळगाव बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला व्यापारी बांधवांनी चांगला...

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद

54
0

शरीफ शेख – रावेर

जळगाव , दि. ३० :- जिल्ह्यातील यावल येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला , सकाळ पासुन शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने पुर्णपणे बंद होती तर काही भागातील व्यवसायीकांनी आपली दुकाने ही तुरळक स्वरूपात बंद ठेवली होती त्यामुळे या भारत बंद यावल शहरात चांगला प्रतिसाद मिळाला या बंदच्या निमित्ता काढण्यात आलेल्या मोर्चात युवकांनी मोठया प्रमाणात आपला सहभाग नोंदवला.

यावेळी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,केन्द्रातील भाजपा सरकारने देशात सीएए( नागरीकता संशोधन कायदा ) एनआरसी ( राष्ट्रीय नागरीकता नोंदणी ) आणी एनपीआर ( राष्ट्रीय लोक संख्या नोंदणी ) अशा प्रकारे जुलमी कायदे आणण्यात आले आहेत . सीएए कायद्याला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर तो राज्यसभेत मंजुरीसाठी आला. खरं म्हणजे सीएएला राज्यसभेत मंजुरी मिळाल्या नको होती , परन्तु राज्यसभेतही हा कायदा पारित झाला , राज्यसभेत भाजपाचे बहुमत नाही पण सीएए राज्यसभेत मंजुरीसाठी आला असता काँग्रेस , समाजवादी पक्ष , बहुजन समाज पार्टीच्या राज्यसभा खासदारांनी सभागृहातुन काढता पाय घेतला . त्यामुळे बहुमतासाठी संख्याबळ कमी झाले परिणामी राज्यसभेत देखील सीएए कायदाला मंजुरी मिळाली. या कायद्यांच्या माध्यमातुन एससी , एसटी , ओबीसीला , जबरदस्तीने हिन्दु बनवण्याचा कार्यकर्म आहे .ब्राम्हणांनी अशा प्रकारचा कार्यक्रम १९२२पासुन सुरु केला , त्यामुळे मुस्लीमांनी या कायद्याविरोधात जास्त प्रातिक्रीया देऊ नयेत, ज्या एससी, एसटी , ओबीसीला हिन्दु म्हणुन गणले जाणार आहे , त्यांना ब्राम्हणांच्या गुलामीतुन मुक्त करण्यासाठी हातभार लावावा .एससी , एसटी .ओबीसीला हिन्दु बनवुन मुस्लीम विरोधात दंगल करण्यास प्रवृत करण्याचा ब्राम्हणांचा हा सर्व आटापीटा सुरू आहे . त्याकरिता बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २९ / १ / २०२०रोजी भारत बंदचे आवाहन केले होते , यावल शहरातील बुरुज चौकातुन शेकडो युवकांनी मोर्चा काढुन व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते या आवाहनाला शहरातील व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला . यावेळी पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार व पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला बंदोबस्त चोख पाळला .

Unlimited Reseller Hosting