Home विदर्भ कवयित्री मनीषा कांबळे आंबेडकरी पुरस्काराने सन्मानित..!

कवयित्री मनीषा कांबळे आंबेडकरी पुरस्काराने सन्मानित..!

119

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. ३० :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिवंगत रेखाताई शंकराव ढेंगळे नागपूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मनीषा कांबळे यांना आंबेडकरी पुरस्कार २०२० ने झांन भूमी येथे सन्मानित करण्यात आले.

कळंब तालुक्यातील चापर्डा येथील झांन भूमी येथे बुद्धिस्त सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा शाखा यवतमाळ यांच्यावतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजामध्ये चळवळ जिवंत राहण्याकरता कविता व नाटकाच्या माध्यमातून समाजात सामाजिक प्रबोधन करण्याचं उल्लेखनीय कार्य कवयित्री मनीषा कांबळे गत बारा वर्षापासून करीत असून यांना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा यवतमाळच्या वतीने आंबेडकरी पुरस्कार डॉ. अशोक बोधी यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमात धर्मपाल माने अध्यक्ष राष्ट्रीय बुद्ध महासभा, डॉ. अरुण जनबंधू ,नरेंद्र मेश्राम,सदाशिव भालेराव, महादेव वाढवे,भीमराव लिंगे,डॉ.प्रविण लोहले, डॉ. प्रदीप मेंढे,दिलीप वाघमारे, शिवदास कांबळे,भारती मेश्राम विक्रांत गायकवाड या कार्यक्रमाला उपस्थित होते.