
वाशिम:-पोलीस ठाणे रिसोड जि. वाशिम येथे दि. १२/०५/२०२० रोजी फिर्यादी भावनाताई पुंडलिकराव गवळी,रा. रिसोड, अध्यक्षा महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण रिसोड व जनशिक्षण संस्था वाशिम यांनी आरोपी संस्थेचे सचिव अशोक नारायणराव गांडोळे, उपाध्यक्ष सौ. वर्षाताई अशोकराव हेलसकर व संस्थेचे ईतर संचालक, कर्मचारी सदस्य गणेश बालाजी ढोले, सौ. अरुणा संजय हलगे, शकुंतला बालाजी कासार, महेश उर्फ विवेक ज्ञानदेव देवगिरे, हरिभाऊ ज्ञानेदेव देवगीरे, मधूकर नारायण हेलसकर, उध्दव नारायण गांडोळे, समाधान उर्फ दुर्गाप्रसाद मधूकर हेलसकर, सि.ए. उपेंद्र गुणवंतराव मुळे, भागवत छगन पेंदे, दिशेन दशरथ दोरशेटवार, विनोद साहेबराव पांढरे, भार ज्ञानदेव देवगिरे, संतोष बद्रीप्रसाद सोमाणी, युवराज लिंबाजी पांढरे, व धनंजय मनोहर हलगे या १९ आरोपी विरुद्ध महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण रिसोड व जनशिक्षण संस्था वाशिम यांच्या मार्फतीने चालविले जाणारे देगांव येथील आयुर्वेदिक बी. ए. एम. एस. महाविद्यालय, बी. फार्म, डी. फार्म व भावना पब्लीक स्कुल मध्ये नमुद आरोपी हे सचिव, संचालक, कर्मचारी, सदस्य पदावर असताना सन २००८ ते जुन २०१९ पर्यंत विदयार्थ्यांचे शैक्षणीक फी ची व्हाउचरव्दारे १९,८५,४२,७५६/- रुपयाचे अपहार केल्याचे तक्रारीवरून अप. न. ३८९ / २०२० कलम ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि. कलम १३ (१) (अ), (ब), १३(२) भ्रष्ट्राचार प्रतिबंधक (सुधारणा) अधिनियम २०१८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपीतांनी शासकीय अनुदानाचे अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयात आता पर्यंत १. उपेंद्र गुणवंतराव मुळे, संस्था सि.ए. रा. औरंगाबाद २. धनजय मनोहर
हलगे क्षेत्र सहायक रा. सुंदरवाटीका वाशीम ३. समाधान उर्फ दुर्गाप्रसाद मधूकर हेलसकर, संस्था सदस्य रा. येवता ता. रिसोड ४. संतोष उध्वराव हेलसकर संस्था सदस्य रा. रिसोड ५. उध्दव नारायण गांडोळे, संस्था सदस्य रा. येवता ता. रिसोड ६. संतोष बद्रीप्रसाद सोमाणी लेखापाल रा. केशवनगर ता. रिसोड या ०६ आरोपींना अटक करण्यात असून गुन्हयातील ०१ आरोपी हा मयत झाला असून ०१ आरोपीची अटकपूर्व जामीन झाली आहे व ०१ आरोपीची अंतरीम जामीन झालेली आहे.गुन्हयातील उर्वरीत १० आरोपी १. अशोक नारायण गांडोळे संस्था सचिव रा.जे.डी.सी. प्लॅटीनम टॉवर,महर्षी नगर, स्वारगेट पुणे २. सौ. वर्षाताई अशोकराव हेलसकर संस्था उपाध्यक्ष रा.जे.डी.सी. प्लॅटीनम टॉवर, महर्षी नगर,स्वारगेट पुणे ३. गणेश बालाजी ढोले रा.जे.डी.सी. प्लॅटीनम टॉवर, महर्षी नगर, स्वारगेट पुणे ४.
शकुंतला बालाजी ले / कासार रा.जे. डी. सी. प्लॅटीनम टॉवर, महर्षी नगर, स्वारगेट पुणे ५. महेश उर्फ विवेक ज्ञानदेव देवगिरे रा. जे. डी. सी. प्लॅटीनम टॉवर, महर्षी नगर, स्वारगेट पुणे ६. हरिभाउ नामदेव देवगिरे रा.जे.डी.सी.प्लॅटीनम टॉवर, महर्षी नगर, स्वारगेट पुणे ७. भारत ज्ञानदेव देवगिरे रा. जे. डी. सी. प्लॅटीनम टॉवर, महर्षी नगर,स्वारगेट पुणे ८.दिनेश दशरथ दोरशेटवार रा. साई महक अपार्टमेंन्ट, मोहन नगर नागपूर ९. विनोद साहेबराव पांढरे रा.मु. पो. गौंडाळा ता. रिसोड जि. वाशिम व १०. युवराज लिंबाजी पांढरे रा.मु.पो. बाळे ता. जि. सोलापूर यांची अटकपूर्व जामीन वि. जिल्हा न्यायाधिश – १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाशिम यांनी फेटाळलेली आहे.नमुद १० आरोपी आपली अटक टाळण्याकरीता फरार राहल्याने सदर आरोपीचे वि. जिल्हा न्यायाधिश – १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाशिम यांचेकडून पकड वारंट घेण्यात आले होते. आरोपी हे आपली अटक टाळण्याकरीता फरार राहल्याने पकड वारंटची बजावणी होवू शकली नाही. नमुद आरोपी हे गुन्हयात फरार झाल्याने व वारंटची जबावणी चुकविण्यासाठी गुप्तपणे वावरत असल्याने वि. जिल्हा न्यायाधिश – १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाशिम यांनी दिनांक १०/०६/२०२२ रोजीचे आदेशान्वये नमुद १० आरोपींना कलम ८२ Crpc अन्वये व्यक्तीश: वि.न्यायालया समोर दिनांक ०८/०७/२०२२ रोजी पर्यंत हजर राहण्याबाबत फर्मविले आले आहे. गुन्हयातील आरोपी वि. न्यायालया समोर हजर न झाल्यास त्यांचे मालमत्ता जप्तीची कारवाई होणार आहे.सदर गुन्हयाचा तपास मा. बच्चनसिंह पोलीस अधीक्षक वाशीम यांचे मार्गदर्शनाखाली श्री. यशवंत केडगे,ऊपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर हे करीत असून शासनाचे वतीने वि. सत्र न्यायालयात श्री. अभिजीत व्यवहारे, सरकारी वकील हे काम पहात आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206











































