Home मराठवाडा मी होणार सुपरस्टार’ या रियालिटी शो मध्ये संकल्प काळे ची निवड

मी होणार सुपरस्टार’ या रियालिटी शो मध्ये संकल्प काळे ची निवड

267

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील संकल्प काळे याने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ या मालिकेतील अतिशय महत्त्वाच्या व अटीतटीचा समजला जाणारा मेगा राऊंडमध्ये पहिल्या दहा जणांमध्ये संकल्प काळे याने भरारी घेतली आहे. त्याला आदर्श शिंदे, बेला शेंडे आणि सलील कुलकर्णी यांच्या हस्ते मानाचा फेटा मिळाला आहे. दरम्यान शनिवारपासून (ता. १४) संकल्प काळे यात सादरीकरण करणार आहे. वडीगोद्री सारख्या ग्रामीण भागातील छोटा स्पर्धक संकल्प काळे याचे कौतुक केल्या जात आहे.