Home मराठवाडा शहापूर येथे अपघातात मोटारसायकलस्वार ठार

शहापूर येथे अपघातात मोटारसायकलस्वार ठार

610

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शहापूर येथे समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की,अंबडकडुन वडीगोद्रीच्या दिशेने जाणारी मोटारसायकल क्रमांक एम. एच.२१ ड्ब्ल्यु १४४१ व वडीगोद्रीकडून जालन्याच्या दिशेने जाणारी लोडिंग पिकअप एम.एच.२१ बि.एच.२२४१ यांची शहापूर शिवारात जोरदार धडक झाली.हि धडक एवढी जोराची होती कि या धडकेत मोटारसायकलस्वार जगदिश विक्रम जाधव (वय ३५ वर्ष) हे लालवाडी ता.अंबड हे जागीच ठार झाले.

गोंदि पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला असुन अपघातात ठार झालेल्या व्यक्तीला उत्तर तपासणीसाठी अंबड येथील शासकिय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.