Home महत्वाची बातमी कारंजा घाडगे येथील कारनदी मत्स्यव्यवसाय कांचे आमरण उपोषण

कारंजा घाडगे येथील कारनदी मत्स्यव्यवसाय कांचे आमरण उपोषण

352
0

 

रवींद्र साखरे –  कारंजा घाडगे

वर्धा :- भोई समाजातील मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांनी कारंजा घाडगे तहसील कार्यालय जवळ विविध मागण्या घेऊन आमरण उपोषण चालू केले मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांच्या प्रमुख मागण्या. 1) कार नदी मत्सव्यवसाय संस्थेद्वारे मा. प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय विभाग नागपूर यांना दि. १६/७/२०२० व ११/८/२०२० रोजी पत्र पाठविण्यात आले आणि पत्रात दि. ३ जून २०१७ च्या शासन निर्णयानुसार ठेका रक्कम भरण्यास विलंब झाल्यास दंड व व्याजासह रकमेचा भरणा करून मुदतवाढ देता येते तसेच कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मासेमारांना दुसरे कोणतेही कामे नसल्यामुळे व त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

 

तसेच दि. ७/७/२०२० च्या पत्राच्या अनुशंघाने सदर जलाशयाच्या ठेक्याचे अंतिम वर्षाचे नूतनीकरण करण्यात यावे. 2) लक्ष्मणराव बापूरावजी नांदणे यांची नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून दि. २/३/२०२२ रोजी निवड करण्यात आल्यानंतर दि. १५/३/२०२२ रोजी संस्थेचे मा. प्रशासक साहेब यांच्या हस्ते संस्थेतील रेकॉर्ड स्वीकारण्यात आला. रेकॉर्ड स्वीकारल्यानंतर अध्यक्षांनी सगळ्यांना बोलावून त्यांच्या समक्ष रेकॉर्ड तपासण्यात आले असता त्यात लाखो नाही तर करोडो रुपयांचा घोळ निर्दशनास आला. १४ वर्षाच्या कालावधीत अध्यक्ष/सचिव यांनी कधी संस्थेचा हिशोब दिला नाही आणि संस्थेच्या सर्व कागदपत्रावर खोट्या सह्या, खोटे बिल आणि काही वर्षाचा रेकॉर्ड गहाळ करण्यात आला व त्या वेळेस चे अध्यक्ष व सचिव यांनी 28 ऑगस्ट 2019 रोजी तळेगाव पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली होती असे निर्दशनास दिसून आल्यामुळे मागील अध्यक्ष / सचिव यांच्यावर सखोल चौकशी लावून संपूर्ण रेकॉर्डची तपास करून तपशील काढण्यात यावा व अध्यक्ष/सचिव यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, व कार नदी प्रकल्प येथील मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना लवकरात लवकर मासेमारीचा ठेका व्याजासहित रकमेचा भरणा करून देऊन मुदत वाढ करून देण्यात यावी व न्याय देण्यात यावे अशी मागणी भोई समाजातील मत्स्यव्यवसाय करणाऱ्या उपोषणकर्त्यांची आहे.

Previous articleसी डेट एक्सप्लोजीव्ह कंपनीच्या कामगारांनी दिला माणुसकीचा परीचय
Next articleआदर्श शिक्षक कुळसंगे गुरुजी यांचे निधन…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.